अंकलीजवळ रास्ता रोको

By Admin | Updated: August 26, 2015 00:12 IST2015-08-26T00:12:32+5:302015-08-26T00:12:32+5:30

पानसरेंच्या मारेकऱ्यांना अटक करा : ‘डीपीआय’चा मोर्चा काढण्याचा इशारा

Stop the road near Uncle | अंकलीजवळ रास्ता रोको

अंकलीजवळ रास्ता रोको

जयसिंगपूर : डॉ. नरेंद्र दाभोळकर व गोंविद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अद्याप अटक करण्यात शासन अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ डेमॉक्रेटिक पार्टी आॅफ इंडियाच्यावतीने मंगळवारी सांगली-कोल्हापूर महामार्गावरील अंकली टोलनाक्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे सुमारे तासभर वाहतूक अडकून पडली होती. निवेदन स्वीकारण्यास संबंधित विभागाचे अधिकारी न आल्याने निषेध करून गृहराज्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर ‘पायताण मोर्चा’ काढण्याचा इशारा देण्यात आला. डॉ. नरेंद्र दाभोळकर व गोंविद पानसरे यांची हत्या करणारे अजून मोकाटच आहेत. लवकरात लवकर सीबीआय चौकशीद्वारे मारेकऱ्यांना अटक करावी, या मागणीसाठी सांगली-कोल्हापूर महामार्गावर उदगाव येथील अंकली टोलनाक्याजवळ मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले. एक तासाहून अधिक वेळ महामार्ग रोखून धरण्यात आला होता. यावेळी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी रघुनाथ देशिंगे म्हणाले, समाजाला दिशा देणाऱ्या पानसरे व दाभोळकर यांची हत्या सुपारी देऊन झाली आहे. मारेकऱ्यांना अटक करण्यात शासन अपयशी ठरल्याचा त्यांनी निषेध व्यक्त केला. सुभाष साठे म्हणाले, आता गृहराज्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर पायताण मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी बळ द्यावे, असे आवाहन केले.यावेळी रमेश शिंदे, रघुनाथ देशिंगे, राजेश शिंदे, सुनील शेळके, अ‍ॅड. संभाजीराजे नाईक, विनायक कांबळे, प्रमोद तिवडे, शंशिकांत साठे, महेश तिवडे, नितीन बागे, पिंटू पवार, किरण कांबळे, तानाजी सोनुर्ले, मनू नलवडे, गणेश तिवडे, श्रीपती सावंत, सचिन साठे, कार्यकर्ते उपस्थित होते.

ेशासनाचा प्रतिनिधी फिरकला नाही
शिरोळ तहसील कार्यालयाला पूर्वसूचना देऊनही शासनाचा एकही प्रतिनिधी आंदोलनस्थळी निवेदन स्वीकारण्यासाठी न आल्यामुळे शासनाचा निषेध म्हणून साडी-चोळी, बांगड्यांचा आहेर देऊन बोंबठोक आंदोलन करण्यात आले. पोलीस उपाधीक्षक सरवदे व सहायक पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक दूर केली.

Web Title: Stop the road near Uncle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.