संजय राऊतांच्या जिभेला लगाम घाला : संभाजीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 01:03 AM2020-01-13T01:03:24+5:302020-01-13T01:03:33+5:30

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ...

Stick the tongue of Sanjay Rauta: Sambhajiraj | संजय राऊतांच्या जिभेला लगाम घाला : संभाजीराजे

संजय राऊतांच्या जिभेला लगाम घाला : संभाजीराजे

Next

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवरायांची तुलना मोदींशी करणं महाराजांच्या वंशजांना मान्य आहे का? असा सवाल केला.
त्यावर खासदार संभाजीराजे यांनी टिष्ट्वटद्वारे राऊत यांच्यावर हल्ला चढविला. टिष्ट्वटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘उद्धवजी संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घाला. ते प्रत्येक वेळी छत्रपती घराण्यावर गरळ ओकून राजकारण करत आहेत. त्यांनी आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंती कार्यक्रमात (सिंदखेड राजा) काय बोललो आहे ते. त्यांची मुजोरी सहन केली जाणार नाही.’ त्यांच्या या टिष्ट्वटला संजय राऊत यांनी देखील उत्तर देत आपण छत्रपती घराण्याचा नेमका काय अपमान केला आहे? असा प्रश्न केला. ते म्हणाले, ‘माननीय छत्रपती संभाजीराजे आम्ही आपला नेहमीच आदर करतो. संजय राऊत यांनी असं कोणतं विधान केलं? ज्यामुळे छत्रपती घराण्याचा अवमान झाला? हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानेच चालत आहे. सदैव चालत राहिल. धन्यवाद आणि जय महाराष्ट्र.’

Web Title: Stick the tongue of Sanjay Rauta: Sambhajiraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.