पावले पुन्हा वळली घराकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:24 IST2021-07-27T04:24:49+5:302021-07-27T04:24:49+5:30

कोल्हापूर : अतिवृष्टी आणि पुरामुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांची पावले आता पुन्हा घराच्या दिशेने वळली आहेत. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पाणी ...

Steps turned again towards the house | पावले पुन्हा वळली घराकडे

पावले पुन्हा वळली घराकडे

कोल्हापूर : अतिवृष्टी आणि पुरामुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांची पावले आता पुन्हा घराच्या दिशेने वळली आहेत. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पाणी ओसरलेल्या तालुक्यातील गावागावांमधील लोक आता आपल्या घरी परतू लागले आहेत. कोल्हापूर शहरासह चंदगड, आजरा, गडहिंग्लज या तालुक्यांमधील नागरिकांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे. शिरोळ आणि हातकणंगले भागातील नागरिकांना मात्र अजून पाणी ओसरण्याची वाट पाहावी लागणार आहे.

जिल्ह्यात २० तारखेपासून पावसाने थैमान सुरू केले. २१ ते २३ तारखेपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे सगळ्या नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांचे स्थलांतर करावे लागते. कोल्हापूर शहरातील सुतारमळा, नागाळा पार्क, शाहुपुरी तर करवीरमधील चिखली आंबेवाडी, आरे, तसेच सर्व तालुक्यातील ३८८ गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दीड लाखांवर नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. चिखली आंबेवाडी येथील नागरिक कल्याणी हॉल, शाळेत निवाऱ्याला थांबले आहेत. याशिवाय पूरबाधित झालेले काही नागरिक मुस्लीम बोर्डिंग, शाहू सांस्कृतिक हॉल अशा ठिकाणी वास्तव्यास आहेत. बहुतांशी नागरिकांनी हॉटेल आणि नातेवाइकांकडेच जाणे पसंत केले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत दिली आहे आणि राधानगरी धरणाचे तीन दरवाजेदेखील बंद झाल्याने पुराचे पाणी आता बऱ्यापैकी ओसरले आहे. त्यामुळे चार दिवस पाण्याने वेढलेले शहरातील रस्ते पुन्हा खुले झाले आहेत, दुसरीकडे आजरा, चंदगड, गडहिंग्लज या तालुक्यांमधील नागरिक आपआपल्या घरी जात आहेत.

---

पूरबाधित गावे:- ३८८

पूर्णतः बाधित- ३४

अंशतः बाधित- ३५४

स्थलांतरित कुटुंब संख्या : २९ हजार १५७

स्थलांतरित नागरिक : १ लाख ४५ हजार ९३०

नातेवाइकांकडे : १ लाख २८ हजार ८३८

निवारा कक्षेत - १६ हजार ९९७

कोविड रुग्ण : १४६

स्थलांतरीत जनावरे- ५४ हजार ९४९

--

चिखली, आंबेवाडी, शिरोळ, हातकणंगले अजून पाण्यात

सध्या पूर ओसरत असला तरी अजून चिखली, आंबेवाडी येथील घरांमध्ये पाणी आहे. कल्याणी हाॅल व शाळेत जवळपास १६० लोक राहत आहे, १५० लोक पै-पाहुण्यांच्या घरी गेले आहेत. कोल्हापूरमधील पुराचे पाणी पुढे शिरोळ, हातकणंगलेला जात असल्याने तेथील परिस्थिती अजून जैसे थे असल्याने या भागातील नागरिकांना पाणी ओसरेपर्यंत आणखी २-३ दिवस वाट पाहावी लागणार आहे.

---

पुढील आठवड्यात पुन्हा पावसाचा इशारा

सध्या पाऊस कमी झाला असला तरी हवामान खात्याने पुढील आठवड्यात पुन्हा मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांनी १५ ऑगस्टपर्यंत नागरिकांनी छावणीतच राहावे असे आवाहन केले आहे. मात्र एवढे दिवस छावणीत, पाहुण्यांकडे राहणे शक्य नाही. गावाकडे आपल्या घरादाराला सोडून आलेल्या नागरिकांना परतीचे वेध लागले आहेत.

----

Web Title: Steps turned again towards the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.