वडगावात चबुतऱ्यावर गुरुवारी छत्रपत्री शिवाजी पुतळा बसविण्यात येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:05 IST2021-02-05T07:05:12+5:302021-02-05T07:05:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व परिसर सुशोभिकरणाची कामे गतीने सुरू ...

वडगावात चबुतऱ्यावर गुरुवारी छत्रपत्री शिवाजी पुतळा बसविण्यात येणार
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठवडगाव : येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व परिसर सुशोभिकरणाची कामे गतीने सुरू आहेत. शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा चबुतऱ्यावर गुरुवारी (दि. २८) बसविण्यात येणार आहे. ही मूर्ती शहरात आल्यानंतर प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात येणार आहे. या दिवशी नागरिकांनी घरावर भगवे ध्वज लावावेत. रांगोळी, फुलांची सजावट करून लोकोत्सव करावा, असे आवाहन नगराध्यक्ष मोहनलाल माळी, गटनेत्या प्रविता सालपे यांनी पत्रकार परिषदेत केले.
शहरात महालक्ष्मी मंदिरापासून गुरुवारी सकाळी १० वाजता पुतळ्याच्या मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. ही मिरवणूक सरसेनापती धनाजीराव जाधव स्मारक, बिरदेव चौक, एसटी स्टॅण्ड, पालिका चौक, आंबेडकर चौकातून पद्मा रोड मार्गे शिवाजी पुतळा येथे जाणार आहे. या पुतळा मिरवणूक मार्गावर शहरवासीयांनी भगवे ध्वज, रांगोळी सजावट करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
संपूर्ण सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाल्यावर मान्यवरांच्याहस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी अजय थोरात, अभिनंदन सालपे, संदीप पाटील, शरद पाटील, सुनीता पोळ, संतोष गाताडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.