शिक्षक संघाच्या राज्य संपर्क प्रमुखपदी एस. व्ही. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:13 IST2020-12-28T04:13:27+5:302020-12-28T04:13:27+5:30

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य संपर्क प्रमुखपदी एस. व्ही. पाटील - सडोलीकर यांची नियुक्ती करण्यात आली. संघाचे नेते ...

As the state liaison head of the teachers' union, S. V. Patil | शिक्षक संघाच्या राज्य संपर्क प्रमुखपदी एस. व्ही. पाटील

शिक्षक संघाच्या राज्य संपर्क प्रमुखपदी एस. व्ही. पाटील

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य संपर्क प्रमुखपदी एस. व्ही. पाटील - सडोलीकर यांची नियुक्ती करण्यात आली. संघाचे नेते संभाजीराव थोरात यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले.

संभाजीराव थोरात म्हणाले, एस. व्ही. पाटील यांनी गेली ३३ वर्षे संघाच्या माध्यमातून जिल्ह्यात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. स्वखर्चाने शैक्षणिक उपक्रम राबवणारे ‘एस. व्ही.’ हे हाडाचे शिक्षक असून पाणपोई, सुट्यांचे कार्ड, शिष्यवृत्ती सराव परीक्षांचे आयोजन, जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या माध्यमातून ते सतत शिक्षकांच्या संपर्कात राहिले. संपर्क प्रमुख पद ते सक्षमपणे सांभाळतील व त्यामुळे संघ बळकट होईल.

एस. व्ही. पाटील म्हणाले, सेवेत लागल्यापासून संघ सोडून कोणताही विचार केला नाही. संघटनेकडून आपणास काय मिळाले, काय मिळेल, याची अपेक्षा न करता संघटना बळकटीसाठी प्रयत्नशील राहिलो. आगामी काळात संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुके पिंजून काढून संघटना भक्कम करू. यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील, जिल्हा नेते दिनकरराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष के. वाय. कुंभार, विष्णू काटकर, बाबुराव खोत, नंदकिशोर देसाई, मनोज माळवदकर आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य संपर्क प्रमुख म्हणून एस, व्ही. पाटील यांना संभाजीराव थोरात यांनी नियुक्ती पत्र दिले. यावेळी दिनकरराव पाटील, रविकुमार पाटील, के. वाय. कुंभार उपस्थित होते. (फोटो-२८१२२०२०-कोल-शिक्षक संघ)

Web Title: As the state liaison head of the teachers' union, S. V. Patil