राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अश्विनी वडगावे प्रथम
By Admin | Updated: August 26, 2014 21:51 IST2014-08-26T20:41:40+5:302014-08-26T21:51:16+5:30
काव्यवाचनात औरंगाबादचा भारती : ‘उत्स्फूर्त’मध्ये कोल्हापूरचा आदमापुरे प्रथम

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अश्विनी वडगावे प्रथम
गडहिंग्लज : गडहिंग्लजचे माजी आमदार व विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एस. एस. घाळी यांच्या स्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सांगलीच्या कस्तुरबाई वॉलचंद कॉलेजची अश्विनी वडगावे हिने प्रथम क्रमांक पटकाविला, तर काव्यवाचन स्पर्धेत औरंगाबादच्या विवेकानंद कॉलेजच्या अश्विनी भारती याने, तर उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या रोहन आदमापुरे याने प्रथम क्रमांक पटकाविला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल अनुक्रमे असा : पूर्वतयारी वक्तृत्व अफसर शेख (आनंदराव धोंडे कॉलेज कडा), निकीता पाटील (देवगिरी कॉलेज, औरंगाबाद), रोहित देशमुख (म. फुले कॉलेज अहमदनगर), निरंजन फरांदे (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर), साक्षी गांधी (डी. बी. जे. कॉलेज चिपळूण)काव्यवाचन स्पर्धा - रणजित कांबळे (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), विजय चौगुले (न्यू कॉलेज, कोल्हापूर), हिमानी कुलकर्णी (राजाराम कॉलेज, कोल्हापूर), सुप्रसाद दीक्षित (शंकरराव कॉलेज, पुणे), मंदार पाटील (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर),उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा - रणजित पाटील (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), विजय चौगुले (न्यू कॉलेज कोल्हापूर), अफसर शेख (आनंदराव धोंडे महाविद्यालय बीड), भाग्यश्री रेडेकर (विवेकानंद कॉलेज कोल्हापूर), महावीर पाटील (डी. आर. माने महाविद्यालय कागल)मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. परीक्षक म्हणून कृष्णात पाटील, संदीप मगदूम, प्रा. पी. बी. रक्ताडे, प्रा. सुभाष कोरे, गोविंद पाटील, बाळ पोतदार, सुरेश चव्हाण, प्रा. पी. डी. पाटील, प्रा. आनंद बल्लाळ यांनी काम पाहिले. जि. प. अध्यक्ष उमेश आपटे, नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, उदयराव जोशी, मीना कोल्हापुरे, डॉ. सदानंद पाटणे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी होते.यावेळी अरविंद कित्तुरकर, सचिव अॅड. बाबूराव भोसकी, किशोर हंजी, डॉ. शिवकुमार कोल्हापुरे, महेश घाळी, प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील, आदीं उपस्थित होते.