सविता नांगरे यांना राज्यस्तरीय ‘गुणवंत शिक्षकरत्न’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:29 IST2021-08-20T04:29:36+5:302021-08-20T04:29:36+5:30
वारणानगर : जाखले (ता. पन्हाळा) येथील नाईक वसाहत विद्यामंदिर शाळेच्या शिक्षिका सविता सुनील नांगरे यांना मुंबई येथील मनुष्यबळ विकास ...

सविता नांगरे यांना राज्यस्तरीय ‘गुणवंत शिक्षकरत्न’ पुरस्कार
वारणानगर : जाखले (ता. पन्हाळा) येथील नाईक वसाहत विद्यामंदिर शाळेच्या शिक्षिका सविता सुनील नांगरे यांना मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी महाराष्ट्र संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षकरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
जाखलेजवळच्या नाईक वसाहत प्राथमिक शाळेतील शिक्षिका नांगरे यांना त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात यश आले. समाजातील काही पालक मेंढपाळ, ऊसतोड, दुसऱ्याच्या शेतावर काम करणारे आहेत. ते आपल्याबरोबर मुलांनाही घेऊन जात होते. ती मुले शिक्षणापासून वंचित राहत होती. पहिली ते पाचवीपर्यंत शाळेत फक्त दहा ते बारा विद्यार्थी हजर राहत होते.
गटशिक्षणाधिकारी ए. एम. आकुर्डेकर, माजी केंद्रप्रमुख लालासाहेब जाधव, चंद्रकांत कडवेकर, मुख्याध्यापिका सुरेखा कुंभार, लक्ष्मण मोरे, पती पोलीस नाईक सुनील नांगरे यांचे प्रोत्साहन लाभले.
फोटो १९सविता नांगरे