सृजनचे राज्यस्तरीय सृजन पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:24 IST2021-02-10T04:24:00+5:302021-02-10T04:24:00+5:30
यंदाचा सृजन जीवनगौरव पुरस्कार गडहिंग्लजचे ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत नाईक यांना जाहीर झाला आहे तसेच विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याचा गौरव ...

सृजनचे राज्यस्तरीय सृजन पुरस्कार जाहीर
यंदाचा सृजन जीवनगौरव पुरस्कार गडहिंग्लजचे ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत नाईक यांना जाहीर झाला आहे तसेच विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून मान्यवरांना राज्यस्तरीय सृजन साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे १६ वे वर्ष असून याही वर्षी महाराष्ट्रातून ४२ मान्यवरांचे प्रस्ताव आले होते. त्यातील खालील मान्यवरांची निवड करण्यात आली.
विलास पाटील (मुंबई) सहकार भूषण, सागर सावर्डेकर (सावर्डे कागल) यशस्वी उद्योजक, एम. डी. रावण (मुरगूड ) सृजन शिल्पकार, जयश्री गायकवाड (इचलकरंजी) उत्कृष्ट प्रशासकीय सेवा, विजय पाटील (शिरगांव राधानगरी) आदर्श शिक्षक, सुषमा पाटील (कोल्हापूर) समाजभूषण, अमृत सुतार (मुंबई) उत्कृष्ट पत्रकार, एम. एस. जाधव (हातकणंगले) साहित्यरत्न, विजय बागडी (कोल्हापूर) उपक्रमशील शिक्षकांना राज्यस्तरीय सृजन पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. मानपत्र, दीड हजारची ग्रंथभेट. सन्मानचिन्ह. कोल्हापुरी फेटा असे पुरस्काराचे स्वरूप आहे.