जयसिंगपूरच्या साने गुरुजी संस्थेला राज्यस्तरीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:29 IST2021-06-09T04:29:48+5:302021-06-09T04:29:48+5:30

मनुष्यबळ विकास अकादमीचे अध्यक्ष अ‍ॅड. कृष्णजी जगदाळे यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष अरविंद मजलेकर, उपाध्यक्ष मधुकर काळेल यांनी हा पुरस्कार ...

State level award to Sane Guruji Sanstha of Jaysingpur | जयसिंगपूरच्या साने गुरुजी संस्थेला राज्यस्तरीय पुरस्कार

जयसिंगपूरच्या साने गुरुजी संस्थेला राज्यस्तरीय पुरस्कार

मनुष्यबळ विकास अकादमीचे अध्यक्ष अ‍ॅड. कृष्णजी जगदाळे यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष अरविंद मजलेकर, उपाध्यक्ष मधुकर काळेल यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी अध्यक्ष मजलेकर म्हणाले, साने गुरुजी शिक्षण संस्थेकडून नेहमीच सामाजिक बांधीलकी जोपासली जाते. वर्धापनदिनी संस्थेने दिव्यांगांना साहित्याचे वितरण, शहीद जवानांच्या कुटुंबांना आर्थिक मदत, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, शिबिर व मार्गदर्शन, शिक्षण परिषद, गुणवंतांचा सन्मान, अनाथ बालगृहाला मदत, महापूर व कोरोना काळात मदत यांसह विविध कार्यक्रम राबविले आहेत. या सामाजिक कार्यामुळे संस्था प्रगतिपथावर आहे. २७ कोटी ठेवी असून, संस्थेस ‘अ’ वर्ग दर्जा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष आदगोंडा पाटील, राजगोंडा हुलिकिरे, सुरेश पाटील, सुरेखा कुंभार, शरद सुतार, मेहबुब मुजावर, संपत कोळी, प्रकाश नरुटे, लक्ष्मण कबाडे, दत्तात्रय कमते, जयश्री माने, नीता पाटील, महादेव कांबळे, मनीषा पाटील उपस्थित होते.

Web Title: State level award to Sane Guruji Sanstha of Jaysingpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.