शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: वारणा शिक्षण संकुल आता विद्यापीठ, राज्य सरकारची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 12:21 IST

वारणानगर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील श्री वारणा विभाग शिक्षण मंडळास ‘वारणा विद्यापीठ म्हणून राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली. मुख्यमंत्री ...

वारणानगर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील श्री वारणा विभाग शिक्षण मंडळास ‘वारणा विद्यापीठ म्हणून राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वारणा विद्यापीठ म्हणून मान्यता मिळाली आहे. या बातमीचे वृत्त रविवारी सांयकाळी समजताच वारणा परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव झाला.श्री वारणा सहकारी उद्योग व शिक्षण समूह हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा समूह म्हणून ओळखला जातो. वारणा समूहाचे संस्थापक संस्थापक सहकारमहर्षी स्व. तात्यासाहेब कोरे यांनी वारणेच्या फोंडया माळावरती साखर कारखान्याबरोबरच शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या सुविधा सुरू करून शिक्षणाचे केंद्र बनवले. वारणा शिक्षण मंडळात केजीपासून प्राथमिक,माध्यमिक आणि उच्च शिक्षणांपर्यंतच्या सर्व शैक्षणिक सुविधा सुरू केल्या आहेत. आज हे संकुल शिक्षण क्षेत्रातील अव्वल दर्जाचे ओळखले जाते. वारणा संकुल वारणा विद्यापीठ व्हावे यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. उच्च व तंत्रशिक्षण खात्याच्या आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले.

वारणा पंचक्रोशीतील सर्वसामान्य व छोट्या घटकांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवी ओळख निर्माण करून देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वारणा शिक्षण समूहाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. आता वारणा विद्यापीठास मान्यता मिळाली असल्याने शिक्षण क्षेत्रात नवी सुरुवात झाली. या विद्यापीठाच्या माध्यमातून सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांना अपेक्षित नवा माणूस घडवण्याचा मूळ विचार विद्यापीठाच्या केंद्रस्थानी ठेवला आहे असल्याचे वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जीनी यांनी सांगितले.वारणा विद्यापीठास मंजुरी मिळाल्याचे समजताच वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉ. विनय कोरे, वारणा शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही.व्ही. कार्जीनी यांच्यासह वारणा शिक्षण संकुल आणि वारणा परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव झाला. परिसरात ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा झाला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरuniversityविद्यापीठGovernmentसरकार