शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणात राज्य सरकारची भूमिका वेळकाढूपणाची, अशोक चव्हाण रेटून बोलतात :चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 18:46 IST

Politics chandrakant patil Kolhapur-मराठा समाजाला दिलेले आरक्षण राज्य मागासवर्गीय अहवालाच्या आधारेच असाधारण स्थितीत दिले गेल्याचे सर्वोच्च न्यायालयात पटवूून देता आले तर हे आरक्षण टिकण्यात अडचण येणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

ठळक मुद्देमराठा आरक्षणात राज्य सरकारची भूमिका वेळकाढूपणाची :चंद्रकांत पाटील अशोक चव्हाण खोटेच पण रेटून बोलत असल्याची टीका

कोल्हापूर : मराठा समाजाला दिलेले आरक्षण राज्य मागासवर्गीय अहवालाच्या आधारेच असाधारण स्थितीत दिले गेल्याचे सर्वोच्च न्यायालयात पटवूून देता आले तर हे आरक्षण टिकण्यात अडचण येणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

परंतु, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सरकारच या प्रश्नात फारसे गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या सुनावणीत इतर राज्यांना याचिकेत बोलाविण्याची महाराष्ट्र सरकारची भूमिका वेळकाढूपणाची व गुंतागुंत वाढवणारी आहे, अशीही टिप्पणी त्यांनी यावेळी केली.१०२ व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांना जातीवर आधारित आरक्षण देता येणार नाही असे सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण समन्वय समितीचे प्रमुख अशोक चव्हाण खोटेच परंतु रेटून बोलत असल्याची टीकाही त्यांनी केली. त्यांनी उच्च न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका भाजपतर्फे न्यायालयात दाखल करण्याचा विचार करू, असेही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Politicsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलAshok Chavanअशोक चव्हाणkolhapurकोल्हापूर