शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

राज्य सरकारने संभाजीराजे यांना चर्चेसाठी बोलाविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 19:09 IST

Maratha Reservation, Sambhaji Raje Chhatrapati, Uddhav Thackeray, kolhapur मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या वैद्यकीयसह अन्य अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी राज्य शासनाने सुपर न्युमररी (अधिसंख्य) जागा वाढवून प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली होती. त्यावर याबाबत चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने त्यांना बोलाविले आहे.

ठळक मुद्देराज्य सरकारने संभाजीराजे यांना चर्चेसाठी बोलाविले मुंबईत मंगळवारी बैठक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटणार

कोल्हापूर : मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या वैद्यकीयसह अन्य अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी राज्य शासनाने सुपर न्युमररी (अधिसंख्य) जागा वाढवून प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली होती. त्यावर याबाबत चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने त्यांना बोलाविले आहे.मुंबईत मंगळवारी (दि. १ डिसेंबर) बैठक होणार आहे. त्या दरम्यान ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत निर्माण झालेल्या प्रश्नाकडे लोकमतने एमबीबीएसच्या प्रवेशामध्ये मराठा तरुणांची कोंडी या वृत्ताद्वारे शनिवारी (दि. २१) लक्ष वेधले. त्यानंतर गेल्या आठवड्यापासून याबाबतच्या अन्य वृत्तांच्या माध्यमातून लोकमत पाठपुरावा करीत आहे. त्याची दखल घेत खासदार संभाजीराजे यांनी दि. २४ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठविले होते.

त्यावर सुपर न्युमररीसह मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी मुंबईला येण्याचे निमंत्रण सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दूरध्वनीवरून दिले आहे. या चर्चेमध्ये मी सुपर न्युमररीचा मुद्दा मांडणार आहे. या दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री ठाकरे हे चर्चेसाठी वेळ देणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही कळविण्यात आले आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी शुक्रवारी दिली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीUddhav Thackerayउद्धव ठाकरेkolhapurकोल्हापूर