शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विमानतळासाठी २८ कोटींचा निधी मिळणार, मान्यता मिळाली; विस्तारीकरणास चालना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 12:34 IST

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी २८ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य सरकारने गुरुवारी मान्यता दिली. सामान्य ...

कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळाच्या विकासासाठी २८ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य सरकारने गुरुवारी मान्यता दिली. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा अध्यादेश काढला. कोल्हापूर विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचे काम सध्या पूर्ण झाले आहे. मात्र, विस्तारीकरणांतर्गत अनेक कामे सुरू आहेत. धावपट्टी वाढवण्याबरोबरच आणखी काही भूसंपादन करण्यात येणार आहे. यासाठी निधीची कमतरता पडू नये, यासाठी विमानतळाच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस हा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली. 

राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी लेखाशीर्ष ३०५३ व ०१६४ खाली निधी उपलब्ध करून देण्यात येतो. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. यापैकी वित्त विभागाने मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून २१० कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित केला आहे. 

यातील २६.८२ कोटी कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी दिला. दरम्यान, उर्वरित १५० कोटी रुपयांचा निधी राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी विमानतळ विकास कंपनीला वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. यात कोल्हापूर विमानतळासाठी २८ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. हा निधी ३१ मार्चपूर्वी खर्च करावा लागणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळ