स्टेट बॅँकेची यंत्रमागधारकांसोबत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:31 IST2021-09-10T04:31:28+5:302021-09-10T04:31:28+5:30
इचलकरंजी : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये व्यवहार करताना येणाऱ्या अडचणीसंदर्भात झालेल्या बैठकीत यंत्रमागधारकांनी आपल्या अडचणी मांडल्या. ही बैठक पॉवरलूम ...

स्टेट बॅँकेची यंत्रमागधारकांसोबत बैठक
इचलकरंजी : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये व्यवहार करताना येणाऱ्या अडचणीसंदर्भात झालेल्या बैठकीत यंत्रमागधारकांनी आपल्या अडचणी मांडल्या. ही बैठक पॉवरलूम असोसिएशनच्या सभागृहात झाली. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली.
बँकेचे कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयाचे मुख्य प्रबंधक अनिकेत शेजवळ, इचलकरंजी शाखेचे सुक्ष्म, लघु व मध्यम विभागाचे प्रबंधक स्वानंद शितोळे यांनी अडचणी जाणून घेतल्या. असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी उद्योग, स्टेट बँकेकडून कामकाजात येत असलेल्या अडचणी, समस्या, उद्योजकांच्या अपेक्षा, जुन्या कर्जावरील अडचणी, कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीतील अडचणी, एनपीएची खाती याची माहिती दिली. कारखानदार योगेश वाघमारे, सुधीर उत्तुरे, रमेश पाटील, गजानन मेटे, नंदकुमार कांबळे यांनी बँकेत व्यवहार करताना येणाऱ्या अडचणी सांगितल्या.
दोन्ही अधिकाऱ्यांनी बँकेकडून ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्याबरोबर कर्जासंबंधी समस्या सांगून त्या त्वरित दूर करण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. बैठकीस दत्तात्रय कनोजे, चंद्रकांत पाटील, प्रमोद महाजन, सुभाष बलवान, आदी उपस्थित होते.