राज्य बालनाट्य स्पर्धा शुक्रवारपासून

By Admin | Updated: December 31, 2014 00:10 IST2014-12-31T00:01:58+5:302014-12-31T00:10:39+5:30

१८ नाटकांचा समावेश : शाहू स्मारक भवनमध्ये होणार सादरीकरण

State Ballett competition from Friday | राज्य बालनाट्य स्पर्धा शुक्रवारपासून

राज्य बालनाट्य स्पर्धा शुक्रवारपासून

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यावतीने आयोजित १२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला शुक्रवारपासून (दि.२ जानेवारी) प्रारंभ होत आहे.
शाहू स्मारक भवन मध्ये सकाळी साडेदहा ते संध्याकाळी पावणेसात या वेळेत ही बालनाट्ये सादर होतील. या स्पर्धेत २ व ३ तारखेला ७ बालनाट्ये व ४ तारखेला ४ बालनाट्ये अशारीतीने एकूण १८ नाटके सादर होणार आहेत. त्यात कोल्हापूर शहरातील काही शाळांसह जयसिंगपूर, आजरा, पेठवडगाव तसेच रत्नागिरीमधीलही काही संस्थांनी सहभाग घेतला आहे.
 

Web Title: State Ballett competition from Friday