शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
5
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
6
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
7
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
8
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
9
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
10
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
11
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
12
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
13
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
14
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
15
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार
16
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
17
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
18
जन्मभर विसरणार नाही असा धडा भारतास शिकवू; सिंधू जल करार स्थगितीमुळे पाकच्या धमक्या वाढल्या
19
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
20
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा

जिल्ह्यातील राज्य व प्रमुख मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 12:18 IST

कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्ह्यातील राज्य व प्रमुख मार्ग बंदपर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

कोल्हापूर: जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.करवीर तालुक्यातील शिंगणापूर रामा-194 तसेच शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद, बाचणी बंधाऱ्यावर पाणी आल्याने शिरोली दुमालाकरिता पर्यायी मार्ग कसबा बीड, शिरोली घानवडे प्रजिमा 29 पासून तसेच बाचणीकरिता सडोली पासून वाहतुक सुरू, इस्फूर्ली, नागाव, खेबवडे, बाचणी मार्गे वाहतुक सुरू आहे.

महे पुलावर पाणी आल्याने सांगरूळ, आमशी, कसबा बीड व प्रजिमा 29 मार्गे वाहतुक सुरू, कोगे बंधाऱ्यावर पाणी आल्याने कुडित्रे करिता गगनबावडा मार्गे व कोगे करिता बालिंगा पाडळी कोगे मार्गे वाहतुक सुरू. हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी नवीन पुलावरुन वाहतूक सुरू, निलेवाडी- पारगाव पुलावर पाणी आल्याने अमृतनगर,चिकोर्डे मार्गे वाहतुक सुरू  आहे.गगनबावडा तालुक्यातील शेणवडे, अणदूर, धुंदवडे रस्त्यावर पाणी आल्याने अणदूर,मांडूकली, वेतवडे मार्गे वाहतुक सुरू, प्रजिमा क्र. 19 वर पाणी आल्याने पर्यायी मार्ग नसल्याने वाहतुक बंद आहे. शिरोळ तालुक्यातील शिरढोण पुलावर पाणी आल्याने नांदणी जयसिंगपूर मार्गे वाहतूक सुरु आहे.कागल तालुक्यातील सर पिराजीराव तलावातील पाणी रस्त्यावर आल्याने हासुर, बोळावी, ठाणेवाडी व देवगड, राधानगरी, मुरगुड मार्गे वाहतूक सुरु. बस्तवडे बंधाऱ्यावर पाणी आल्याने अनुर ते बानगे मार्गे वाहतूक सुरु आहे.पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने पोहाळे-पोहाळेवाडी व मलकापूर, येळवण, मांजरे, अणुस्कुरामार्गे वाहतुक सुरू, करंजफेण रस्त्यावर पाणी आल्याने मलकापूर, येळवण, जुगाई, अनुस्कूरामार्गे वाहतुक सुरू, केर्ली जोतिबा रस्ता खचल्याने गायमुख वळण रस्त्यावरून मार्गे वाहतूक सुरू, गोठे पुलावर पाणी आल्याने मल्हारपेठे, सुळे, कोदवडे मार्गे वाहतुक सुरू, काखे पुलावर पाणी आल्याने वाहतुक बंद, माजगाव पुलावर पाणी आल्याने कळे, पुनाळ, दिगवडे मार्गे वाहतूक सुरू आहे.चंदगड तालुक्यातील इब्राहिमपूर पुलावर पाणी आल्याने कनुर गवसे मार्गे वाहतूक सुरु, चंदगड पुलावर पाणी आल्याने पाटणे फाटा, पाटणे, मोटणवाडी मार्गे वाहतुक सुरू, दाटे गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने आमरोली, सोनारवाडी मार्गे वाहूक सुरु, करंजगाव पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद आहे.  प्रजिमा क्र.62 मार्गावर पाणी आल्याने वाहतुक बंद, म्हालेवाडी,नित्तूर सीडी वर्कवर, कोवाड गावाजवळ तसेच काणूर व गवसे गावाजवळ पाणी आल्याने पर्यायी मार्ग नसल्याने वाहतुक बंद आहे.गडहिंग्लज तालुक्यातील निलजी बंधाऱ्यावर पाणी आल्याने दुंडगे, जरळी, मुंगळी, नुल मार्गे वाहतूक सुरु. येणेचवंडी कॉजवेवर पाणी आल्याने नुल, भडगाव, बेरडवाडी, नरेवाडी, नंदनवाड मार्गे वाहतुक सुरू, हलकर्णी कॉजवेवर पाणी आल्याने बसरगे, येणेचवंडी, नंदनवाड, हलकर्णी मार्गे वाहतूक सुरु आहे.राधानगरी तालुक्यातील शिरगाव बंधाऱ्यावर पाणी आल्याने तारळे, राशिवडे मार्गे वाहतूक सुरु. शाहूवाडी तालुक्यातील कानसा नदीवरील मालेवाडी पुलावर पाणी आल्याने तुरूकवाडी, मलकापूर,निळे, भेंडवडे, उदगीरी, राघूचा वाडा, शित्तुर, उखळू मार्गे वाहतुक सुरू आहे. वारणा नदीवरील आरळा शित्तुर पुलावर पाणी आल्याने तुरूकवाडी, कोकरूड, शेडगेवाडी, आरळा मार्गे वाहतुक सुरू. आजरा तालुक्यातील साळगाव बंधाऱ्यावर पाणी आल्याने ओडीआर 139 सोहाळे, बाची, आजरा सुतगिरणीमार्गे वाहतूक सुरू आहे.

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर