शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मैदानांसह जलतरण तलाव सुरू करा : वीरधवलने केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 16:18 IST

Aditya Thackrey, Swimming, kolhapurnews गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील मैदाने, जलतरण तलाव बंद आहेत. सरावाअभावी राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करणाऱ्या खेळाडूंचे भवितव्य अंधारात आले आहे. त्यामुळे ती लवकर सुरू करावी, अशी मागणी ऑलिम्पियन जलतरणपटू वीरधवल खाडे याने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सोमवारी भेट घेऊन केली.

ठळक मुद्दे मैदानांसह जलतरण तलाव सुरू करा : वीरधवलने केली मागणी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची घेतली भेट

कोल्हापूर : गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील मैदाने, जलतरण तलाव बंद आहेत. सरावाअभावी राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करणाऱ्या खेळाडूंचे भवितव्य अंधारात आले आहे. त्यामुळे ती लवकर सुरू करावी, अशी मागणी ऑलिम्पियन जलतरणपटू वीरधवल खाडे याने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सोमवारी भेट घेऊन केली.यावेळी झालेल्या चर्चेत वीरधवल याने कोरोनाच्या कहरानंतर कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून पाश्चिमात्य देशात विशेषत: अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आदी देशांमध्ये जलतरण तलाव, जीम, मैदाने सुरू झाली आहेत. त्यात ऑलिम्पिकसह सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांची तयारी तेथील जलतरणपटू जोमाने करीत आहेत. माझ्यासह अन्य जलतरणपटूंची ऑलिम्पिकची तयारी सुरू आहे.

मात्र, भारतात विशेषत: मुंबईसह राज्यात एकही जलतरण तलाव खास आमच्यासारख्या जलतरणपटूंना सरावासाठी उपलब्ध नाही. ज्याप्रमाणे केंद्र व राज्य शासनाने नेमबाजीसाठी शूटिंग रेंज उपलब्ध करून दिली. त्याप्रमाणे जलतरणपटूंनाही सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम व अटी लागू करून जलतरण तलाव सुरू करण्यास परवानगी द्यावी. यावेळी आंतरारष्ट्रीय जलतरणपटू संदीप शेजवळसह अन्य जलतरणपटू उपस्थित होते. 

टॅग्स :Swimmingपोहणेkolhapurकोल्हापूरAditya Thackreyआदित्य ठाकरे