हुपरीत ग्रामीण रुग्णालय सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:26 IST2021-01-03T04:26:12+5:302021-01-03T04:26:12+5:30
हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) व परिसरातील जनतेला सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण ...

हुपरीत ग्रामीण रुग्णालय सुरू करा
हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) व परिसरातील जनतेला सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्यात यावे. तसेच रेंदाळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, हुपरी व परिसरातील जनतेच्या आरोग्य सेवेचा मार्ग सुखकर होण्यासाठी राज्य सरकार या मागणीची पूर्तता लवकरात लवकर करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिले.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार सत्यजित पाटील, उल्हास पाटील, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, सुजित मिणचेकर, गौरव नायकवडी, आदी उपस्थित होते.
०२ हुपरी शिवसेना निवेदन
फोटो ओळी -हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्यात यावे, या मागणीचे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. यावेळी उदय सामंत, राजेंद्र पाटील-यड्रावकर, अरुणभाई दुधवडकर, खासदार धैर्यशील माने, खा. संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार सत्यजित पाटील, उल्हास पाटील, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, सुजित मिणचेकर, गौरव नायकवडी, आदी उपस्थित होते.