सदस्य नोंदणीला सुरुवात

By Admin | Updated: August 5, 2014 00:04 IST2014-08-04T22:51:07+5:302014-08-05T00:04:55+5:30

छोटा भीम बालचमूंच्या भेटीला

The start of the registration of the members | सदस्य नोंदणीला सुरुवात

सदस्य नोंदणीला सुरुवात

सातारा : ‘लोकमत बालविकास मंच २०१४-१५’ च्या सदस्य नोंदणीस सातारा शहरात काल (रविवार)पासून सुरुवात झाली. बालमनाचा खरा सोबती म्हणून बालविकास मंच लहान मुलांमध्ये लोकप्रिय आहे. वेगवेगळ्या स्पर्धांची भन्नाट मनोरंजनाची, वाढत्या कॉन्फिडन्सची धम्माल असलेल्या बालविकास मंचची या वर्षातील सभासद नोंदणीचा शुभारंभ येथील गुरुकुल स्कूलमध्ये झाला. यावेळी विद्यार्थ्यांना हमखास गिफ्ट आणि सक्सेस स्टोरीज हे पुस्तक देण्यात आले.
यावेळी बालाजी चॅरिटेबलचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, शाळेच्या मुख्याध्यापिका लीना जाधव, शीला वेल्हाळ आणि जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे उपस्थित होते.
‘लोकमत’च्या उपक्रमाचे कौतुक करताना चोरगे म्हणाले, ‘लोकमत बालविकास मंच’च्या सभासदांना ‘सक्सेस स्टोरीज’ हे पुस्तक दिल्यामुळे त्यांची वाचनाची आवड तर वृृद्धिंगत होईलच; पण यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा त्यांच्या ज्ञानात मोलाची भर घालतील आणि त्यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवूनच हे विद्यार्थी घडतील.’
बालविकास मंचच्या प्रत्येक सभासदास यावर्षी मनोरंजनाच्या भरघोस मेजवानीसोबत मोफत सुविधांची आणि लकी ड्रॉमधून अनेक बक्षिसे मिळविता येणार आहेत. १५० रुपये इतके अल्प सभासद शुल्क भरून प्रत्येक सभासदाला १५४ रुपये किमतीची वॉटर बॉटल, १०० रुपये किमतीचे ‘सक्सेस स्टोरीज’ पुस्तक मोफत मिळणार आहे. याशिवाय अमर सायकल एजन्सीच्या फायरफॉक्स बाईक स्टेशनमार्फत ८,००० रुपये किमतीची स्पोर्टस् सायकल लकी ड्रॉमधून जिंकता येणार आहे. सोबतच ‘राहुल ज्यूस सेंटरच्या सौजन्याने ३० भाग्यवान सदस्यांना वाढदिवसानिमित्त चार व्यक्तींना मँगोशेक मोफत मिळणार आहे. तर हमखास बक्षिसांमध्ये प्रत्येक सभासदाला सिटी सेंटरतर्फे १५० रुपयांचे खरेदी कूपन मिळणार असून, खरेदीवर हमखास भेटवस्तूदेखील मिळणार आहे. सभासदांच्या मातेला सलोनी ब्युटीपार्लरच्या वतीने १५०रुपयांचे हेअरकट सुविधा मोफत मिळणार आहे आणि लायन्स क्लब आॅफ सातारा कॅम्प संचलित नॅब हॉस्पिटलमार्फत डोळ्यांची तपासणी आणि चष्मा लागला असल्यास नंबरचा चष्मा एम्पथी फाउंडेशनमार्फत मोफत दिला जाणार आहे.
सभासद झाल्यानंतर केवळ १५० रुपयांमध्ये जवळपास २५४ रुपयांच्या भेटवस्तू आणि जवळपास ६०० रुपयांच्या मोफत सुविधा सभासदांना मिळणार आहेत. नर्सरी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी बालविकास मंचमध्ये सहभागी होऊ शकतात. सभासद होण्यासाठी ‘लोकमत’ कार्यालय, गुरुअलंकार कॉम्प्लेक्स, शेटे चौक, गुरुवार पेठ, सातारा येथे संपर्क साधावा.(प्रतिनिधी)
छोटा भीम बालचमूंच्या भेटीला
बालविकास मंचमध्ये नव्याने सभासद होणाऱ्या बालचमूंसाठी शनिवारी म्हणजेच १६ आॅगस्ट रोजी शाहू कलामंदिर, सातारा येथे ‘छोटा भीम’ या बालनाट्याचा प्रयोग आयोजित केला आहे.

Web Title: The start of the registration of the members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.