दत्त मंदिराचा स्लॅब टाकण्याचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST2021-07-14T04:28:28+5:302021-07-14T04:28:28+5:30
इचलकरंजी : हरोली (ता. शिरोळ) येथील दत्त मंदिराचा स्लॅब टाकण्याचा प्रारंभ आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. विश्वगुरू ...

दत्त मंदिराचा स्लॅब टाकण्याचा प्रारंभ
इचलकरंजी : हरोली (ता. शिरोळ) येथील दत्त मंदिराचा स्लॅब टाकण्याचा प्रारंभ आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. विश्वगुरू श्री दत्तात्रय स्वामी देव चॅरिटेबल ट्रस्टतर्फे श्री दत्त मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. यावेळी अनिल गिरी, नगरसेवक सुनील पाटील, संजय आरेकर, सुभाष शेळके, सयाजी गायकवाड, आदी उपस्थित होते.
विमा पॉलिसीचे वितरण
इचलकरंजी : शहर व परिसरातील वस्त्रोद्योग क्षेत्रात महिलांसाठी उतरविलेल्या विमा पॉलिसीचे विक्रमनगर परिसरातील महिलांना युवा नेते स्वप्निल आवाडे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. आमदार प्रकाश आवाडे यांच्या संकल्पेतून यंत्रमाग व्यवसायात कार्यरत महिलांचा एक लाख रुपयांचा अपघाती विमा पॉवरलूम असोसिएशनच्या माध्यमातून उतरविण्यात आला आहे. यावेळी राजाराम बोंगार्डे, नारायण दुरूगडे, महावीर कुरुंदवाडे, हौसाबाई गायकवाड, सुरेखा ठाणेकर, आदी उपस्थित होते.