गांधीनगरचे भूमी अभिलेख कार्यालय त्वरित सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:28 IST2021-07-07T04:28:52+5:302021-07-07T04:28:52+5:30

गांधीनगर (ता. करवीर) येथील भूमी अभिलेख कार्यालय त्वरित सुरू करा, अशी मागणी अमोल एकळ फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने जिल्हा भूमी अभिलेख ...

Start the Land Records Office of Gandhinagar immediately | गांधीनगरचे भूमी अभिलेख कार्यालय त्वरित सुरू करा

गांधीनगरचे भूमी अभिलेख कार्यालय त्वरित सुरू करा

गांधीनगर (ता. करवीर) येथील भूमी अभिलेख कार्यालय त्वरित सुरू करा, अशी मागणी अमोल एकळ फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक डॉ. वसंतराव निकम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

गांधीनगर येथील भूमी अभिलेख कार्यालय अनेक महिन्यांपासून बंद आहे. अनेकांच्या नोंदी, विविध प्रकारचे दाखले मिळत नसल्याने मिळकतधारकांची मोठी गैरसोय होत आहे. विविध शासकीय कामांसाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडील कागदपत्रांची मालमत्ताधारकांना गरज भासत आहे. कोरोनामुळे संसर्गामुळे बंद ठेवलेले हे कार्यालय योग्य ती दक्षता घेऊन ताबडतोब सुरू करावे, अन्यथा जनतेच्या मागणीसाठी लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही अमोल एकळ यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. शिष्टमंडळाच्या मागणीनंतर जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक डॉ. वसंतराव निकम म्हणाले की, लवकरच हे कार्यालय सुरू करण्यात येईल. तसेच मिळकतधारकांची गैरसोय दूर करण्यात येईल.

Web Title: Start the Land Records Office of Gandhinagar immediately