विक्रमनगरातील इमारतीत कोविड रुग्णालय सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:24 IST2021-04-28T04:24:26+5:302021-04-28T04:24:26+5:30

कोल्हापूर : आयआरबी कंपनीला देण्यात आलेल्या, परंतु सध्या महापालिकेच्या ताब्यात असलेल्या विक्रमनगर येथील इमारतीत कोविड रुग्णालय सुरू करावे, अशी ...

Start Kovid Hospital in a building in Vikramanagar | विक्रमनगरातील इमारतीत कोविड रुग्णालय सुरू करा

विक्रमनगरातील इमारतीत कोविड रुग्णालय सुरू करा

कोल्हापूर : आयआरबी कंपनीला देण्यात आलेल्या, परंतु सध्या महापालिकेच्या ताब्यात असलेल्या विक्रमनगर येथील इमारतीत कोविड रुग्णालय सुरू करावे, अशी सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी महापालिका प्रशासनाला केली.

क्षीरसागर यांनी मंगळवारी महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या गोष्टीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. विक्रमनगरातील इमारत बांधून तयार आहे. त्याठिकाणी एकच मोठे रुग्णालय सुरू केले, तर महापालिका अधिकाऱ्यांची, वैद्यकीय अधिकाऱ्यांची धावपळ वाचेल, रुग्णांना एकाच ठिकाणी सुविधा मिळतील, जास्तीत जास्त रुग्णांवर उपचार करणेही शक्य होईल, असे क्षीरसागर यांनी सांगितले.

शहरातील काही खासगी रुग्णालयांत अजूनही जादा दराने रेमडेसिविर इंजेक्शन विकली जात आहेत, त्यावर नियंत्रण ठेवा, अशी सूचना क्षीरसागर यांनी केली. त्यावर प्रशासक बलकवडे यांनी, त्यासाठी पथके तयार केली असून त्याचे ऑडिट केले जात असल्याचे सांगितले. जादा दर आकारला असेल आणि त्यासंबंधी तक्रारी आल्यास कारवाई करण्याचे आश्वासन बलकवडे यांनी दिले.

अठरा वर्षावरील नागरिकांचे लसीकरण, रुग्णांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत की नाहीत, याचाही आढावा त्यांनी घेतला.

यावेळी उपायुक्त रविकांत आडसुळ, निखिल मोरे, सहायक आयुक्त संदीप घारगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश जाधव, इस्टेट अधिकारी सचिन जाधव उपस्थित होते.

Web Title: Start Kovid Hospital in a building in Vikramanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.