रौप्यनगरीत कचरा उठावासाठी घंटागाडीचा प्रारंभ

By Admin | Updated: October 19, 2015 23:56 IST2015-10-19T23:35:04+5:302015-10-19T23:56:14+5:30

माजी सरपंचांचा उपक्रम : योजनेसाठी स्वत:च्या नावावर घेतले तीन लाखांचे कर्ज

The start of the gangster for the uprooting of waste | रौप्यनगरीत कचरा उठावासाठी घंटागाडीचा प्रारंभ

रौप्यनगरीत कचरा उठावासाठी घंटागाडीचा प्रारंभ

हुपरी : संपूर्ण देशामध्ये ‘रौप्यनगरी’ असा नावलौकिक प्राप्त केलेल्या हुपरी (ता. हातकणंगले) शहराची स्वच्छता आता केवळ रामभरोसेच होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जागोजागी कचऱ्यांचे ढीग साचले जाऊन परिसरामध्ये दुर्गंधीचे साम्राज्य पसरले जात आहे. रौप्यनगरी असा नावलौकिक प्राप्त झालेल्या शहराला असे वातावरण शोभणारे नाही, याची जाणीव झालेल्या माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दौलतराव पाटील यांनी स्वत:च्या नावे तीन लाख रुपयांचे बँक कर्ज घेऊन ‘स्वच्छ हुपरी, सुंदर हुपरी’चे स्वप्न साकारण्यासाठी घटस्थापनेच्या मुहूर्तावर जनतेच्या सेवेसाठी कचरा उठाव करण्यासाठी घंटागाडी सेवेचा प्रारंभ केला.
सुमारे ५५ हजार लोकसंख्या असणाऱ्या व वार्षिक तीन कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाला शहरामध्ये स्वच्छता राखण्याचे सौजन्य दाखविता आले नाही. मात्र, स्वत:च्या नावे कर्जावू लाखो रुपये घेऊन शहरामध्ये स्वच्छता राखण्याचे शिवधनुष्य उचलणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक रौप्यनगरीवासीय तोंडभरून करीत आहेत.
दौलतराव पाटील यांनी आपल्या सरपंचपदाच्या अडीच वर्षांच्या काळामध्ये अतिशय धाडसी निर्णय घेत शहरामध्ये अनेक प्रकारची विकासकामे राबविली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते राज्यातील पहिले सरपंच म्हणून परिचित आहेत. संपूर्ण देशामध्ये रौप्यनगरी म्हणून ओळख असणाऱ्या हुपरी शहरामध्ये जागोजागी, मुख्य रस्त्यावरती, अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र पाहावयास मिळते. परिणामी, परिसरामध्ये दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याने रौप्यनगरीवासीयांतून संताप
व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हा संताप ग्रामपंचायत प्रशासनाला ऐकूच जात नाही. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.
उद्योगपती बाबूराव जाधव, समाजकल्याण सभापती किरण कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजीराव पाटील यांच्या हस्ते कचरा-घंटागीडीचे पूजन करून ग्रामसेवेला प्रारंभ करण्यात आला. या अभिनव उपक्रमाबाबत बोलताना ते म्हणाले, शहरातील कचरा उठाव करण्यासाठी घंटागाडी सेवा लोकार्पण करताना आपणही ‘स्वच्छ भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपक्रमामध्ये सहभागी होत असल्याचा अत्यानंद होत आहे. भविष्यातही जनतेसाठी बहुपयोगी सेवा देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.
या समारंभावेळी सरपंच दीपाली शिंदे, उपसरपंच राजेंद्र सुतार, अजित सुतार, आनंदी माळी, विठ्ठल पाटील, आनंदा कांबळे, सिंधुताई खाडे, रुक्मिणी मुधाळे, धर्मवीर कांबळे, मनसे शहराध्यक्ष गणेश मालवेकर, मोहन वार्इंगडे, नीळकंठ गायकवाड, आण्णासो पाटील, सुरेश इंग्रोळे, आदी उपस्थित होते.


‘स्वच्छ हुपरी’चे स्वप्न साकारण्यासाठी माजी सरपंच व विद्यमान सदस्य दौलतराव पाटील यांनी शहरातील एका बँकेतून तीन लाख रुपये कर्ज स्वत:च्या नावे घेतले.
याच रकमेतून शहरातील घराघरांतील दैनंदिन कचरा उचलण्यासाठी घंटागाडी खरेदी केली.
घटस्थापनेला ही घंटागाडी जनतेच्या सेवेसाठी समर्पित करून ‘स्वच्छ हुपरी, सुंदर हुपरी’च्या अभिनव उपक्रमास सुरुवात केली.
या अभिनव उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक

Web Title: The start of the gangster for the uprooting of waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.