शासकीय तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांच्या छायाचित्र प्रदर्शनास प्रारंभ
By Admin | Updated: May 11, 2017 18:11 IST2017-05-11T18:11:24+5:302017-05-11T18:11:24+5:30
छायाचित्रणाच्या विविध अंगांना स्पर्श

शासकीय तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांच्या छायाचित्र प्रदर्शनास प्रारंभ
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ११ : वाईल्ड लाईफ, व्यक्ती, रस्त्यावरचे आयुष्य, ग्रामीण भागातील जीवनशैली, स्टील फोटोग्राफी अशा छायाचित्रणाच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनास गुरुवारपासून प्रारंभ झाला.
केशवराव भोसले नाट्यगृहाच्या बाबूराव पेंढारकर कलादालनात तंत्रनिकेतनांमार्फत सामूहिक विकास योजना अंतर्गत शासकीय तंत्रनिकेतनच्यावतीने या दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी वाईल्डलाईफ छायाचित्रकार रमण कुलकर्णी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन झाले. यावेळी किर्तीराज देसाई, रविराज सुतार, ऋतुजा देवलभक्त, तुषार साळगावकर उपस्थित होते.
या प्रदर्शनात कोल्हापूर शहरासह जिल्ह्याचे प्रतिबिंब उमटले आहे. कोल्हापूरला लाभलेले निसर्ग सौंदर्य, नागरिकांच्या ठायी असलेली श्रद्धा, रस्त्यावरचे आयुष्य जगणाऱ्यांची व्यथा आणि त्या परिस्थितीत त्यांनी शोधलेला आनंद, स्टील फोटोग्राफी, पर्यटन स्थळे, पक्षीछायाचित्रे, अवकाश निरीक्षण अशा विविध प्रकारची छायाचित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळतील. हे प्रदर्शन शुक्रवार संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहील. रसिकांनी याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.