संगांयो' लाभार्थ्यांना टोकन वाटप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:31 IST2021-04-30T04:31:02+5:302021-04-30T04:31:02+5:30

इचलकरंजी : संजय गांधी योजनेतील निराधारांची बॅँकेत एकाच दिवशी गर्दी होऊ नये यासाठी शासन निर्बंधांचे पालन करत लाभार्थ्यांना ...

Start distributing tokens to Sanganyo 'beneficiaries | संगांयो' लाभार्थ्यांना टोकन वाटप सुरू

संगांयो' लाभार्थ्यांना टोकन वाटप सुरू

इचलकरंजी : संजय गांधी योजनेतील निराधारांची बॅँकेत एकाच दिवशी गर्दी होऊ नये यासाठी शासन निर्बंधांचे पालन करत लाभार्थ्यांना तारीखनिहाय टोकन देण्यात आले. हा उपक्रम संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष राहुल खंजिरे यांनी राबविला. राज्यात पहिल्यांदाच लाभार्थ्यांसाठी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

टोकन उपक्रमाचा प्रारंभ अप्पर तहसीलदार शरद पाटील व नगरसेवक शशांक बावचकर यांनी केला. इचलकरंजीत कष्टकरी व कामगारांची संख्या अधिक आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन पुकारण्यात आल्याने त्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. याची दखल घेत खंजिरे यांनी टोकन पद्धतीचा अवलंब केला. कोरोना संसर्गामुळे अनुदान घेण्यासाठी बॅँकेत होणारी गर्दी टाळावी, हाच उद्देश आहे.

केडीसीसी बॅँकेच्या गावभाग शाखेतील लाभार्थ्यांना वेदभवन येथे, तर मुख्य शाखेतील लाभार्थ्यांना कल्याण केंद्र येथे टोकन दिले जात आहे. लाभार्थ्यांनी सकाळी ७ ते ११ या वेळेत गर्दी न करता नियोजित ठिकाणी उपस्थित राहून आपले टोकन न्यावे. त्यावर नमूद तारखेलाच अनुदान घेण्यासाठी बॅँकेत जावे, असे आवाहन केले आहे. यावेळी शहर कॉँग्रेस समितीचे अध्यक्ष संजय कांबळे, भाऊसाहेब आवळे, राजन मुठाणे, अजित मिणेकर, आदी उपस्थित होते.

Web Title: Start distributing tokens to Sanganyo 'beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.