आजऱ्याच्या धर्तीवर उत्तूरला दुसरे कोविड सेंटर सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:22 IST2021-05-17T04:22:22+5:302021-05-17T04:22:22+5:30
उत्तूर : आजरा येथे खासगी डॉक्टरांच्या धर्तीवर ज्या पद्धतीने कोविड सेंटर सुरू करण्यात येत आहे, त्याप्रमाणे (उत्तूर ता. ...

आजऱ्याच्या धर्तीवर उत्तूरला दुसरे कोविड सेंटर सुरू करा
उत्तूर : आजरा येथे खासगी डॉक्टरांच्या धर्तीवर ज्या पद्धतीने कोविड सेंटर सुरू करण्यात येत आहे, त्याप्रमाणे (उत्तूर ता. आजरा) येथे दुसरे कोविड सेंटर सुरू करा, असे प्रतिपादन उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना आढावा बैठकीत बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मुश्रीफ म्हणाले, आजरा येथे खासगी डॉक्टरांच्या सहकार्याने सुरू होणाऱ्या कोविड सेंटरमध्ये २० ऑक्सिजन बेड उत्तूर परिसरातील जनतेसाठी राखीव ठेवावेत. कोरोनाबाधित रुग्णास घरी न पाठवता कोविड सेंटर अथवा शाळेच्या अलगीकरणात ठेवावे. ग्रामस्थांनी घरात राहूनच कोरोनाची साखळी तोडावी. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता, उत्तूर येथील खासगी डॉक्टरांनी कोविड सेंटर उभे करावे. शासनामार्फत सहकार्य करण्यात येईल.
यावेळी जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश साळे, प्रांताधिकारी संपत खिलारी, तहसिलदार विकास अहिर, पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे, गटविकास अधिकारी डी. बी. वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी यशवंत सोनावणे, उत्तूरचे वैद्यकीय अधिकारी समीर तौकरी, आजरा ग्रामीणच्या वैद्यकीय अधिकारी केळकर, मंडल अधिकारी प्रशांत गुरव, तलाठी कल्याण सोनवणे, वसंतराव धुरे, जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश आपटे, काशिनाथ तेली, शिरीष देसाई, विठ्ठल उत्तूरकर, विजय वांगणेकर, विजय सावेकर, आदी उपस्थित होते. सुधीर सावंत यांनी आभार मानले.
--------------------------
या ठिकाणी होणार कोविड सेंटर
खासगी डॉक्टरांच्या सहकार्यातून बहिरेवाडी येथील डॉ. जे. पी. नाईक स्मारक, उत्तूर विद्यालय अथवा नव कृष्णा व्हॅली ज्युनिअर कॉलेज, उत्तूर यांपैकी एका ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्याच्या हालचाली प्रशासनातर्फे सुरू झाल्या आहेत.
-------------------------
फोटो ओळी : उत्तूर (ता. आजरा) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ. शेजारी प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश आपटे, वसंत धुरे, काशीनाथ तेली, तहसीलदार विकास अहिर, जिल्हा आरोग्याधिकारी योगेश साळे उपस्थित होते.
क्रमांक : १६०५२०२१-गड-०७