गांधीनगरातील सर्व दुकाने सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:17 IST2021-06-10T04:17:12+5:302021-06-10T04:17:12+5:30
गांधीनगर : कोरोना महामारीमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणून अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यापारी दुकाने खुली करावी, या मागणीसाठी होलसेल ...

गांधीनगरातील सर्व दुकाने सुरू करा
गांधीनगर : कोरोना महामारीमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणून अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यापारी दुकाने खुली करावी, या मागणीसाठी होलसेल व्यापारी असोसिएशनच्यावतीने गांधीनगर बाजारपेठेत गुरुवारी (दि. १०) निदर्शने करण्यात येणार आहेत.
होलसेल व्यापारी असोसिएशनची सिंधी सेंट्रल पंचायतमध्ये याप्रश्नी बैठक झाली. त्यामध्ये निदर्शने करण्याचा निर्णय होलसेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश अहुजा व उपाध्यक्ष अशोक तेहल्यानी यांनी जाहीर केला. सिंधू मार्केट ते गणेश चित्र मंदिरापर्यंत व्यापारी आपल्या दुकानासमोर सामाजिक अंतर ठेवून ‘सर्व दुकाने सुरू करा’ असा उल्लेख असलेले फलक घेऊन निदर्शने करतील. त्यानंतर हे फलक दुकानाच्या शटरवर लावण्यात येणार आहेत. या निदर्शनामध्ये अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यापाऱ्यांनी सहभाग द्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. या बैठकीला संतोष डेंबानी, संतोष अहुजा व बक्षाराम दर्डा उपस्थित होते.