(स्टार९१०) कैद्यांनी पिकवलेल्या शेतीतून अडीच हजार जणांना दोन वेळचे जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST2021-07-14T04:27:12+5:302021-07-14T04:27:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांकडून परिसरातच शेती कसून त्यातून वांगी, काकडी, टोमॅटो, फ्लावर, ...

(स्टार९१०) कैद्यांनी पिकवलेल्या शेतीतून अडीच हजार जणांना दोन वेळचे जेवण
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांकडून परिसरातच शेती कसून त्यातून वांगी, काकडी, टोमॅटो, फ्लावर, कोबी आदी पालेभाज्यांसह तांदूळ उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या माध्यमातून कळंबा व बिंदू चौक कारागृहातील सुमारे अडीच हजार कैद्यांना दोन वेळचे जेवण देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोना कालावधीत कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी उत्पादित वस्तू मागणी घटल्याने उत्पादन निर्मितीवर मर्यादा आल्या. त्यात बरेच कैदी पॅरोल रजेवर गेल्याने शेतीकामावरही परिणाम झाला. शेती कसण्यांसह शासनाने ठरवून दिलेली कामे कैद्यांमार्फत करून घेतली जातात. गेल्या आर्थिक वर्षात कैद्यांनी शेती वगळता इतर बनवलेल्या सुमारे एक कोटी रुपयेहून अधिक रकमेच्या विविध वस्तूंची विक्री केल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले. ह्या वस्तू सरकारी कार्यालये, होस्टेल, सरकारी रुग्णालये, न्यायालये येथे विक्री होतात. वस्तूंचे कारागृहाबाहेरही विक्री सेंटर आहे.
कोरोनाकाळातही कोटींचे काम
गेल्या आर्थिक वर्षात कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या विविध उत्पादनाची विक्री करून त्यातून सुमारे एक कोटी रुपयेहून अधिक आर्थिक उत्पन्न मिळाले. कैदी कसत असलेल्या शेतीतून वर्षभरात ६ टन तांदूळ निर्मिती झाला. तसेच रोजच्या कैद्यांच्या भोजनासाठी शेतातील उत्पादन केलेल्या पालेभाज्यांचा समावेश आहे.
काय बनवले जाते...
१) शेती : कळंबा कारागृहाची सुमारे १०० एकर जमीन असून, त्यापैकी सुमारे २५ ते ३० एकर शेती आहे. शेतात धान्यासह पालेभाज्यांचे मोठे उत्पादन घेतले जाते.
२) बेकरी प्रोडक्टस् : कारागृहातही विविध बेकरी उत्पादने बनवली जातात. त्याद्वारे वर्षभरात सुमारे १५ लाखाचे उत्पन्न कारागृहात मिळाले.
३) सुतारकाम : कारागृहात बनवलेल्या वस्तूंचे विशेषत: शासकीय कार्यालयात विक्री होते. वर्षभरात सुतारकामातून १४ लाख २१ हजारांचे उत्पन्न मिळाले.
४) शिवण व यंत्रमाग : शालेय गणवेश, बेडसिट, रुमाल, पायपुसणी याच्यासह साड्या आदी वस्तू शिवणकाम व यंत्रमागावर बनवल्या जातात. कोरोना संकटातही कारागृहात शिवण व यंत्रमागातून बनवलेल्या वस्तू विकून किमान ४० लाखांचे उत्पन्न मिळाले.
५) धोबी, लोहारकाम, जरीकाम : वर्षभरात धोबीकामातून सुमारे दीड लाखाहून अधिक, लोहारकामातून सव्वापाच लाख रुपये, जरीकामातून फक्त साडेअठरा हजाराचे आर्थिक उत्पन्न मिळाले.
लाडू उत्पादन बंद, कोटीचा फटका
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या श्री अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी दरवर्षी सुमारे १ कोटीहून अधिक रकमेचे लाडू बनवले जात होते. गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे मंदिरे बंदच राहिली. परिणामी, कारागृहातील लाडू प्रसाद तयार करणे बंदच झाले आहे. त्यामुळे उत्पन्नास मोठा आर्थिक फटका बसला आहे.
कारागृहातील कैदी
- एकूण कैदी : १९५८
- पॅरोलवर बाहेर कैदी : ६९५
- गंभीर गुन्ह्यातील कैदी : ४०५
- मृत्युदंड : ०१
- परदेशी कैदी : १९
कोट...
‘कैद्यांना त्याच्या कौशल्यानुसार काम दिले. कोरोनात उत्पादनाची मागणी घटल्याने उत्पादन निर्मितीवर परिणाम होत आहे. सद्या गांडूळ खत, सेंद्रिय खतनिर्मिती सुरू आहे. नव्याने मधमाशा पालनद्वारे मध निर्मितीचे प्रयत्न आहेत. - चंद्रमणी इंदुरकर, कारागृह अधीक्षक, कळंबा मध्यवर्ती जिल्हा कारागृह, कोल्हापूर
फोटो नं. १३०७२०२१-कोल-चंद्रमणी इंदूरकर
130721\13kol_2_13072021_5.jpg
फोटो नं. १३०७२०२१-कोल-चंद्रमणी इंदूरकर