शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात ‘स्टार्टअप’पेक्षा ‘स्टँड-अप इंडिया’ आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 12:42 IST

कोल्हापुरातून मागील तीन वर्षात विविध १०० स्टार्टअपची नोंदणी झाली आहे

संतोष मिठारीकोल्हापूर : उद्योगाला चालना देऊन रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी केंद्र सरकारने स्टार्टअप आणि स्टँड-अप इंडिया योजनांची सुरुवात करून पाऊले टाकली. ‘फौंड्री हब’ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात स्टार्टअपच्या तुलनेत स्टँडअप इंडिया योजना आघाडीवर आहे. गेल्या सहा वर्षांत एकूण ५४७ प्रकरणांसाठी बँकांनी कर्ज मंजूर केले आहेत. कोल्हापुरातून मागील तीन वर्षात विविध १०० स्टार्टअपची नोंदणी झाली आहे.केंद्र सरकारने २०१६ मध्ये स्टँड-अप इंडिया ही योजना महिला आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती समुदायातील उद्योजकतेला पाठिंबा देण्यासाठी सुरू केली. याअंतर्गत विविध क्षेत्रातील उद्योग सुरू करण्यासाठी कोल्हापुरातील ५४७ प्रकरणे मंजूर झाली आहेत. त्यांना बँकांच्या माध्यमातून १३३ कोटी ३४ लाखांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.गेल्या तीन वर्षांपासून गती वाढली..

  • स्टार्टअप इंडिया योजना देखील २०१६ मध्ये सुरू झाली; मात्र कोल्हापूर जिल्ह्यात स्टार्टअपची गती गेल्या तीन वर्षांपासून वाढली. केंद्र सरकारच्या स्टार्टअप इंडिया पोर्टलवर कोल्हापूरमधील १०० स्टार्टअपची नोंदणी झाली आहे. त्यातील ३० स्टार्टअप हे नवसंशोधनाशी संबंधित आहेत.
  • शिवाजी विद्यापीठाच्या एसयुके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फौंडेशनच्या मार्गदर्शनाखाली ६, तर सिदम इनोव्हेशन अँड बिझनेस इन्क्युबेशन सेंटरच्या मार्गदर्शनाखाली १८ स्टार्टअप सुरू आहेत.
  • विद्यार्थी, शिक्षक, युवा वर्गाने स्टार्टअप, स्टँड-अप इंडियाद्वारे उद्योग उभारणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील स्टार्टअप कंपन्या आर्थिक अडचणीत आल्याचे चित्र असताना कोल्हापूरमधील स्टँड-अप, स्टार्टअपची स्थिती चांगली दिसत आहे. 

या क्षेत्रातील स्टार्टअपउद्योग, कृषी, शैक्षणिक, हेल्थकेअर, फूड इंडस्ट्री, आदी क्षेत्रातील स्टार्टअप आहेत. कोरोना काळात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पुरवठा, बेड, आदी वैद्यकीय साधनांचे स्टार्टअप जिल्ह्यात सुरू झाले.

स्टँड-अप इंडिया योजनेतून गेल्या सहा वर्षांत कोल्हापुरात एकूण १३३ कोटी ३४ लाख रूपयांचे कर्ज वितरण झाले आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद आहे. -गणेश गोडसे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक 

जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून स्टार्टअपची गती वाढली आहे. शैक्षणिक संस्था स्टार्टअपसाठी पुढे येत असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे स्टार्टअपची संख्या आणखी वाढेल. -प्रतीक ओसवाल, संचालक, सिदम इनोव्हेशन अँड बिझनेस इन्क्युबेशन सेंटर

विद्यार्थी, संशोधक, सर्वसामान्यांच्या अभिनव कल्पनांवर आधारित स्टार्टअपच्या प्रस्तावांना मार्गदर्शनासह गती देण्याचे काम शिवाजी विद्यापीठ करत आहे. विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली सध्या ६ स्टार्टअप सुरू असून आणखी ४ लवकरच सुरू होतील. -डॉ. पी. डी. राऊत, सीईओ, एसयुके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फौंडेशन

टॅग्स :kolhapurकोल्हापूर