शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शाहूपुरीत भरदिवसा चाकूहल्ल्याने खळबळ, हल्लेखोरांकडून कारवर दगडफेक; एकजण जखमी

By उद्धव गोडसे | Updated: May 2, 2023 16:56 IST

गर्दी जमताच हल्लेखोर पसार

कोल्हापूर : शाहूपुरीतील पहिल्या गल्लीत वहिणी खाद्य भांडारसमोर करवीर बेकरीजवळ पांडुरंग शंकर गायकवाड (वय ५०, रा. केर्ली, ता. करवीर) यांच्यावर चाकूहल्ला झाला. दोन ते तीन हल्लेखोरांनी गायकवाड यांच्या कारवर दगडफेक करून कारचे नुकसान केले. हा प्रकार मंगळवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास भरवस्तीत घडला. आर्थिक वादातून हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.घटनास्थळ आणि शाहूपुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग गायकवाड हे मंगळवारी दुपारी कामानिमित्त शाहूपुरीत आले होते. करवीर बेकरीसमोर दोन ते तीन हल्लेखोरांनी त्यांची कार अडवली. त्यांनी गायकवाड यांच्याशी वाद घातला. त्यानंतर एकाने गायकवाड यांच्यावर चाकूने हल्ला केला. प्रसंगावधान राखून गायकवाड बाजूला सरल्याने छातीवर होणारा वार उजव्या दंडावर बसला. याचवेळी इतर हल्लेखोरांनी दगडफेक करून कारच्या काचा फोडल्या. गर्दी जमताच हल्लेखोर पळून गेले. जखमी गायकवाड यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले.चाकूहल्ल्याची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. निरीक्षक राजेश गवळी यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परिसरातील नागरिकांकडून हल्ल्याची माहिती घेतली. त्यानंतर सीपीआरमध्ये जाऊन जखमीचा जबाब नोंदवला. हा हल्ला आर्थिक वादातून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हल्लेखोर कदमवाडी येथील असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यामुळे शाहूपुरी परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस