शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Shaktipeeth Highway: कोल्हापूरकरांची घोर फसवणूक करुन पाठीत खंजीर खुपसला, आमदार सतेज पाटील यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 14:11 IST

लढा तीव्र करणार

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाला विरोध झाल्यानंतर राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरपुरती अधिसूचना रद्द केली होती. ती वाटून त्याचा उत्सव साजरा केला होता. आता मात्र, रेखांकन बदलून कोल्हापुरातून महामार्ग करणार हे अधिसूचनेत स्पष्ट केले आहे. त्यामुळे सरकारने कोल्हापूरकरांची घोर फसवणूक करुन पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी प्रसिद्धीपत्रकातून केला आहे. याविरोधातील लढा तीव्र करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाबद्दलचा नवा अध्यादेश शासनाने जारी केला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील रेखांकनाबद्दलही उल्लेख आहे. महायुतीच्या नेत्यांनी, आमदारांनी निवडणुकीच्या आधी आम्ही हा महामार्ग रद्द करणार, असा शब्द दिला होता. त्यांनीही शब्द फिरवल्याचे आजच्या अध्यादेशाद्वारे स्पष्ट झाले आहे. आदेशातील मुद्दा क्रमांक तीनमध्ये ऑक्टोबरची अधिसूचना रद्द करत असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. जी अधिसूचना मार्चमध्ये होती ती ऑक्टोबरमध्ये रद्द केली होती. कोल्हापूरपुरता महामार्ग रद्द केला होता. ती अधिसूचना या अध्यादेशाद्वारे रद्द केली आहे. म्हणजे कोल्हापुरातून महामार्ग होणार हे या अध्यादेशाद्वारे स्पष्ट झाले आहे. कोल्हापूरकरांची तर फसवणूक झालीच आहे. मात्र शेतकऱ्यांच्या पाठीतही सरकारने खंजीर खुपसला आहे. शासन आधीच आर्थिक अडचणीत आहे. लाखो कोटी रुपयांची बिले दिलेली नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार होईल की नाही अशी साशंकता आहे. त्यामुळे आम्ही शांत बसणार नाही, शक्तिपीठ महामार्ग विरोधात तीव्र आंदोलन करू. हा पैसा खर्च करायचा असेल तर नागपूर-रत्नागिरी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांना पाच हजार कोटी रुपये द्या.

लढा तीव्र करणारमुंबईत लोकल ट्रेनमधून पडून रोज पाचजणांचा मृत्यू होतो. ते मृत्यू थांबवण्यासाठी पैसे द्या. मध्यमवर्गीयांना महागाईतून दिलासा द्या. सरकारी नोकरभरती करा. एमपीएसीच्या मुलांना दिलासा द्या. मात्र गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग करू नका. याविरोधात आता आमचा लढा अधिक तीव्र करणार असल्याचा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

जिल्ह्यातून नवा मार्गही होऊ देणार नाही : राजू शेट्टीशक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनास मान्यता देऊन सरकारने जनतेची आणि शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. तरीही राज्यात शक्तिपीठास तीव्र विरोध करणारच आहे. शिवाय कोल्हापूर जिल्ह्यांत नवीन मार्गही होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.राज्य सरकारने घाई गडबडीने संयुक्त मोजणी पूर्ण न करता व शेतकऱ्यांशी कोणतीही चर्चा न करता वर्धा ते सांगलीपर्यंतच्या भूसंपादनाचे तुघलकी शासनाने आदेश दिले आहेत. महामार्गातून कोल्हापूर वगळण्यात आलेले नाही.उलट वगळण्याचा आदेश रद्द करण्यात आला आहे. म्हणजे शक्तिपीठ महामार्ग कोल्हापुरातून होणारच असा शासनाचा आदेशातून स्पष्ट होते. फक्त जुन्या मार्गाएेवजी दुसरे पर्याय शोधण्यास, लोकप्रतिनिधी बरोबर चर्चा करण्यास सुचवले आहे, असा दावा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी प्रसिध्दी पत्रकातून केला आहे.