सेंट झेविअर्सची पाटणे हायस्कूलवर मात

By Admin | Updated: December 18, 2014 00:30 IST2014-12-18T00:20:33+5:302014-12-18T00:30:00+5:30

सरदार भोपेराव कदम क्रिकेट स्पर्धा

St. Xavier's beat Patna High School | सेंट झेविअर्सची पाटणे हायस्कूलवर मात

सेंट झेविअर्सची पाटणे हायस्कूलवर मात

कोल्हापूर : सेंट झेविअर्स हायस्कूलने तवनाप्पा पाटणे हायस्कूलचा १ गडी राखून पराभव करीत सरदार भोपेराव कदम आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
बुधवारी झालेल्या उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना तवनाप्पा पाटणे हायस्कूलने २८ षटकांत सर्वबाद १३३ धावा केल्या. यामध्ये राजवर्धन पाटीलने ३७, श्रीनाथ आंबने १७, निखिल भोसलेने १४, व्यंकटेश आंबलेने १२ केल्या. ‘झेविअर्स’कडून गोलंदाजी करताना पीयूष कुपटेने ३, ऋतुराज खानविलकरने २, तर प्रथमेश बाजरी, सार्थ मिणचेकर व मौतिक पाटील यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना सेंट झेविअर्स हायस्कूलने ३७.२ षटकांत ९ बाद १३४ धावा करीत विजय संपादन केला.
यामध्ये प्रथमेश बाजरीने ६२, मौतिक पाटीलने २४ धावा केल्या. पाटणे हायस्कूलकडून गोलंदाजी करताना अनिकेत नलवडेने ३, यशवर्धन पाटील व यश भारमल यांनी प्रत्येकी २, तर श्रीनाथ आंबने १ बळी घेतला. १ गडी राखून झेविअर्स हायस्कूलने विजय मिळवला.

Web Title: St. Xavier's beat Patna High School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.