एस.टी.त वाय-फाय!
By Admin | Updated: August 19, 2016 00:34 IST2016-08-19T00:30:40+5:302016-08-19T00:34:42+5:30
प्रवासादरम्यान घ्या गाण्यांचा, चित्रपटांचा आनंद

एस.टी.त वाय-फाय!
कोल्हापूर : प्रवाशांना सातत्याने नवनवीन सेवासुविधा पुरविणाऱ्या एस.टी. महामंडळातर्फे प्रवाशांना आता मोफत वाय-फाय सुविधा देण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर पुणे आगारातील शिवनेरी, हिरकणी व परिवर्तन अशा ५० बसेसमध्येही वाय-फाय सुविधा पुरविली जाणार असून, त्यानंतर साधारण वर्षभरात महामंडळाच्या ताफ्यातील १८ हजार बसेसमध्ये ही यंत्रणा बसविली जाईल.
महामंडळातर्फे प्रवाशांना त्यांचा प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी मोफत वाय-फायची सुविधा देण्यात येणार आहे. या वाय-फायच्या माध्यमातून प्रवाशांना मोबाईलवर गाणी, मालिका आणि इतर कार्यक्रम पाहता येणार आहेत. ही योजना प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत आहे. स्मार्टफोनमधील इंटरनेट ब्राऊझर अॅप उघडल्यानंतर बसमध्ये पुरविला जाणारा यूआरएल देताच प्रवाशांना प्राथमिक माहिती त्यात भरावी लागेल. त्यानंतर मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट, गाणी, बातम्या, कार्टून चित्रपट, टीव्ही मालिकांचा खजिना मोबाईलवर पाहता येईल. +
प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा पुरविण्यात येणार आहे. प्रवाशांची सूचना, मागणी व त्यांची पसंती पाहून, त्यामध्ये सुधारणा करण्यात येऊन महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये ही वाय-फाय सुविधा लवकरच पुरविली जाणार आहे.
- रणजितसिंह देओल
महामंडळाचे उपाध्यक्ष