फुकट्यांकडून एस.टी.ची वसूली
By Admin | Updated: November 27, 2014 00:20 IST2014-11-26T23:56:39+5:302014-11-27T00:20:47+5:30
३४ हजारांचा दंड : आठ महिन्यांत सापडले ३२१ विनातिकीट प्रवासी

फुकट्यांकडून एस.टी.ची वसूली
प्रदीप शिंदे - कोल्हापूर -रेल्वेप्रमाणेच एस.टी.तील फुकट्या प्रवाशांची संख्या वाढतेय. गर्दीचा फायदा घेत काही प्रवासी तिकीट न काढताच उतरून पळ काढतात. वाहकांची नजर चुकवून विनातिकीट प्रवास करणाऱ्या अशा 'फुकट्या' प्रवाशांकडून राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने आठ महिन्यांत ३४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तपासणी पथकांना तब्बल ३२१ जण विनातिकीट प्रवास करताना सापडले.
जानेवारी २०१४ ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीत विविध मार्गांवर ३२१ प्रवासी विनातिकीट आढळून आले. त्यांच्याकडून दंडापोटी ३४ हजार १९७ रुपये रुपये वसूल केले गेले; तर प्रवासी भाडे ३८ हजार ९८४ रुपये वसूल करण्यात आले. कोल्हापूर विभागात १० आगारे असून, त्या अंतर्गत होणाऱ्या बसेसच्या फेऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पाच विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. गर्दीचा फायदा, वाहकाची नजर चुकवून अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. काहीवेळा वाहकाच्या चुका, गर्र्दीच्या वेळी वाहकाचीही तारांबळ उडते. त्याचा फायदा असे लोक घेतात. असे मार्गतपासणी प्रमुख एस. जी. पवार यांनी सांगितले.
महिना विनातिकीट प्रवासी प्रवासी भाडेदंडाची रक्कम
जानेवारी५२ ७,५९८ रु.५,४७८ रु.
फेब्रुवारी३९८,८५५ रु.४,६८८ रु.
मार्च१९१,७१२ रु.२, १०० रु.
एप्रिल२८२,४८० रु.२,९२५ रु.
मे ३१३,९३६ रु. २,९१० रु.
जून३९३,३७३ रु. ३,८०० रु.
जुलै २८१,७६९ रु.३,१८२ रु.
आॅगस्ट३१२,७७८ रु.३,७१४ रु.
सप्टेंबर३२४,५४९ रु.३,२०० रु.
आॅक्टोबर २२१,९३४ रु.२,२००
एकूण३२१३८ हजार ९८४३४ हजार १९७
दंडाची वसुली अशी...
विनातिकीट प्रवाशांकडून दंड आकारणी करताना त्यांनी चुकविलेल्या प्रवासभाड्याच्या दुप्पट रक्कम अथवा शंभर रुपये, यांपैकी जे अधिक असतील तेवढे पैसे द्यावे लागतात. तसेच दंडासह प्रवासभाडे घेतले जाते.
तिकीट घेऊन सहकार्य करावे
विनातिकीट प्रवासी आढळला तर मोटार वाहन कायद्यानुसार त्याच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाते. यात बसचा मार्ग, मागील थांब्याचे अंतर आणि प्रवाशांची संख्या असे मुद्दे लक्षात घेतले जातात. तिकीट काढण्यासाठी पुरेसा वेळ मिळूनही विनातिकीट प्रवासी आढळल्यास वाहकालादेखील जबाबदार धरले जाते. चांगली सेवा देण्यासाठी आम्ही कार्यरत आहोतच; पण तिकीट न काढल्यास महामंडळाचे आर्थिक नुकासान होते. त्यामुळे तिकीट काढून सहकार्य करावे. - सुहास जाधव, विभाग नियंत्रक, कोल्हापूर