शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी ला पावणेचार लाखांचा फटका! मराठा आंदोलनाचा फटका; ७२ फेऱ्या रद्द 

By सचिन भोसले | Updated: September 4, 2023 20:18 IST

एस.टी.महामंडळाच्या कोल्हापूर विभागातून पुण्यासह विविध जिल्ह्यात होणारी वाहतुक मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी नऊ ते दुपारी दोन या कालावधीत बंद करण्यात आली होती.

कोल्हापूर : एस.टी.महामंडळाच्या कोल्हापूर विभागातून पुण्यासह विविध जिल्ह्यात होणारी वाहतुक मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी नऊ ते दुपारी दोन या कालावधीत बंद करण्यात आली होती. यादरम्यान ७२ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे विभागाचे ३ लाख ६९ हजार  ३८७ रुपयांचे उत्पन्न बुडाले. दुपारनंतर ही सेवा पुर्ववत करण्यात आली.

कोल्हापूर विभागातील १२ आगारातून पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, उत्तर कर्नाटक, कोकण आदी ठिकाणी रोज शेकडो फेऱ्या होतात. त्यातून हजारो प्रवासी विविध जिल्ह्यात प्रवास करतात. मराठा आरक्षण आंदोलनाची धग जिल्ह्यात पोहचली . त्यामुळे विशेषत: कोल्हापूरातून पुुणे मार्गावरील प्रवाशांना त्याचा अधिक फटका बसला. सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत ७२ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यात बहुतांशी कोल्हापूर-पुणे मार्गावरील २० बसेसचा समावेश होता. 

या कालावधीत एकूणच १० हजार ८७७ किलोमीटरचे अंतर उपलब्ध बसेसद्वारे होवू शकले नाही. त्यामुळे एकूण ३ लाख ६९ हजार ३८७ रुपयांचा उत्पन्नात फटका बसला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर ही वाहतुक पुन्हा पुर्ववत करण्यात आली. याबाबतचे वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश आले होते. त्यामुळे आंदोलकांकडून बसेसची तोडफोड होवू नये, याकरीता दक्षता म्हणून सकाळी ९ ते दुपारी दोन वाजेपर्यंत बस फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. दुपारनंतर वातावरण बघून सर्वच मार्गावरील बसेस आगारांमध्ये थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध बसेसची तोडफोड होवू नये, प्रवाशांना त्याचा फटका बसू नये, याकरीता सकाळी नऊ ते दुपारी दोन या कालावधीत बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्या दुपारनंतर पुर्ववत केल्या आहेत. - संतोष बोगारे, विभागीय वाहतुक अधिकारी, एस.टी.कोल्हापूर विभाग,

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षण