शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

एसटी गोत्यात; साडेचार हजार कोटींनी तोट्यात! ; आगारप्रमुखांना सुचविल्या काटकसरीच्या उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:38 IST

एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती प्रशासनाने सुधारण्यासाठी खर्चात काटकसर व बचत सुचविताना नवीन पर्याय दिले आहेत. त्याची अमंलबजावणी करा, असेही सर्व आगारप्रमुखांना सूचित केले आहे. याचा गांभीर्याने विचार करावा,

ठळक मुद्देकामगार वेतनवाढीचा मोठा आर्थिक भारही सोसावा लागल्याने राज्य परिवहन मंडळ तोट्यात आले आहे.याचा गांभीर्याने विचार करावा,

शेखर धोंगडे।कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळ (एसटी) आर्थिकदृष्ट्या गोत्यात आले असून, सध्यस्थितीला तब्बल ४५४९.७० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. यामुळे एस.टी. प्रशासन खडबडून जागे झाले आहे. हा तोटा पाच हजार कोटींचा आकडा पार करून जावू नये यासाठी खर्चात काटकसर व बचत करा, असे फर्मान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व आगारप्रमुखांना काढले आहे.

एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती प्रशासनाने सुधारण्यासाठी खर्चात काटकसर व बचत सुचविताना नवीन पर्याय दिले आहेत. त्याची अमंलबजावणी करा, असेही सर्व आगारप्रमुखांना सूचित केले आहे. याचा गांभीर्याने विचार करावा, असा असे वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी यांनी आदेशात म्हटले आहे.

वेतनवाढीचाही मोठा आर्थिक भार!प्रवासी वर्गाला देण्यात येणाऱ्या विविध सवलती, तोट्यातील फे-या, घटलेली प्रवासी संख्या, सातत्याने होणारा अनावश्यक खर्च, प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि शासनाकडून न मिळणारे अनुदान, तसेच २०१६ ते २०२० याकालावधीचा कामगार वेतनवाढीचा मोठा आर्थिक भारही सोसावा लागल्याने राज्य परिवहन मंडळ तोट्यात आले आहे.

अनावश्यक खर्चांवर निर्बंध आणा; उत्पन्न वाढवा

  • प्रवासी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवा,
  • पॉर्इंटची अचानक तपासणी करा.
  • अनावश्यक वस्तूंची खरेदी न करता गरजेच्याच वस्तू खरेदी करा. उत्पन्नातूनच खरेदीच्या रकमेची तरतूद करावी.
  • अनेक विभाग संगणकीकृत केल्यामुळे मनुष्यबळ, पैशांची बचत होते का? याचा आढावा घ्या.
  • अतिकालिक जादा भत्ता असलेल्या चालक-वाहकांचा वापर गरजेनुसारच करा.
  • पहारेकऱ्यांच्या रिक्त जागा खासगी ठेक्याद्वारे भरण्याचा विचार व्हावा.
  • अनावश्यक डिझेल भरू नका, रोजच्या इंधनाचा ताळमेळ ठेवा, वेळोवेळी पंप दुरुस्त करा.
  • टायरमधील हवा तपासा व टायरवरील खर्च आटोक्यात आणा, इमारत दुरुस्ती, रंगकाम, आदी कामे थांबवा, रिकाम्या सदनिका वापरात आणा, येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांना राहण्यास सक्ती करा, स्टेशनरी, झेरॉक्सचा खर्च वाचवा, व्यापारी संकुलाच्या वेळेत निविदा काढून लवकर वापरात आणा.
  • व्यापारी आस्थापनाच्या जागेचे भाडे, पोस्टल मेल, पोलीस वाहन आणि अन्य प्रलंबित वसुली करून न्यायालयीन प्रकरणे टाळून खर्चांवर मर्यादा आणा.
टॅग्स :state transportएसटीMONEYपैसा