एसटीकडून मुंबई, पुण्यासाठी २२ जादा बसेस प्रशासनाकडून तयारी : कोल्हापूर, इचलकरंजी मार्गावर दहा मिनिटाला बस

By Admin | Updated: November 11, 2015 23:39 IST2015-11-11T22:54:42+5:302015-11-11T23:39:25+5:30

एसटीकडून मुंबई, पुण्यासाठी २२ जादा बसेस प्रशासनाकडून तयारी : कोल्हापूर, इचलकरंजी मार्गावर दहा मिनिटाला बस

ST buses ready for Mumbai, Pune, for more than 10 more buses: Kolhapur, bus stop at Ichalkaranj road | एसटीकडून मुंबई, पुण्यासाठी २२ जादा बसेस प्रशासनाकडून तयारी : कोल्हापूर, इचलकरंजी मार्गावर दहा मिनिटाला बस

एसटीकडून मुंबई, पुण्यासाठी २२ जादा बसेस प्रशासनाकडून तयारी : कोल्हापूर, इचलकरंजी मार्गावर दहा मिनिटाला बस

सांगली : एसटीने यंदा प्रथमच दिवाळीच्या हंगामात २० ते २५ टक्के भाडेवाढ केली आहे. सणामुळे गर्दी असल्यामुळे सांगली आगाराने मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक मार्गावर जादा २२ फेऱ्या सुरू केल्या आहेत. स्वारगेट, कोल्हापूर, इचलकरंजी मार्गावर दर दहा ते पंधरा मिनिटाला एक बस सोडली असून मागणीनुसार जादा बसेसही सोडण्यात येतील, अशी माहिती व्यवस्थापक स्वप्निल धनाड व कनिष्ठ आगार व्यवस्थापक महावीर भिलवडे यांनी दिली.
दिवाळीनिमित्त एसटीकडे प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे दरही वाढविले आहेत. यामुळे एसटीकडील गर्दी काही प्रमाणात खासगी प्रवासी वाहतुकीकडे वळली आहे. दर वाढविल्यामुळे उत्पन्नावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. रविवार ते मंगळवारपर्यंत गर्दी होती. विशेषत: मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, नाशिक, इंदापूर मार्गावर गर्दी होती.
स्वारगेट, पुणे मार्गावर दर पंधरा मिनिटाला, तर कोल्हापूर, इचलकरंजी मार्गावर दर दहा मिनिटाला बसेस सोडण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. (प्रतिनिधी)


खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची होतेय लूट
खासगी प्रवासी वाहतूकदारांवर कोणतेही निर्बंध नसल्यामुळे त्यांच्याकडून मनमानी भाडे आकारणी होत आहे. सांगली- मुंबई प्रवासासाठी मंगळवारी स्लिपर गाडीला दोन हजार रुपये भाडे आकारणी केली होती. बुधवारी लगेच ५० ते ७० टक्के कपात करून ६०० रुपये भाडे केले होते. खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून मनमानी भाडे आकारणी होत आहे. खासगी प्रवासी बसेसचेही भाडे निश्चित करण्याची मागणी आहे.

Web Title: ST buses ready for Mumbai, Pune, for more than 10 more buses: Kolhapur, bus stop at Ichalkaranj road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.