शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

कोल्हापूर: ओव्हरटेक करताना अंदाज चुकला; एसटी बस उलटून एक ठार तर सहा प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 18:25 IST

रात्री १२ च्या सुमारास अपघात झाल्याने प्रवाशांत एकच गोंधळ उडाला

सतीश पाटीलशिरोली : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर टोप-संभापूरजवळ टोयोटा शोरुम जवळ कर्नाटक डेपोची एसटी बस उलटून झालेल्या अपघातात एक ठार तर सहा प्रवासी जखमी झाले. जखमींना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल, सोमवारी (दि.१२) रात्री उशिरा हा अपघात झाला.सुधीर भाऊसाहेब पाटील (वय ३२ रा. कुर्ली, ता.निपाणी, जि. बेळगाव) असे मयताचे  नाव आहे. तर मौला आबालाल बागवान, (रा. चिक्कोडी), रोहिणी मारूती कदम (रा.बसर्गे), इश्या बाळासाहेब कांबळे (रा. पुणे), चंद्रशेखर लक्ष्मण गावडे (रा पुणे), रूकय्या बाळून हुसेन सौदागर (रा. बेळगांव), वाहक रविकुमार अशी जखमींची नावे आहेत.याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, हुबळीहून मुंबईकडे कर्नाटक डेपोची एसटी बस निघाली होती. रात्री १२ च्या सुमारास टोप गावच्या हद्दीत टोयोटा शोरुम येथे दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना चालकाला रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज आला नसल्याने भरधाव वेगाने जाणारी एसटी बस महामार्गाच्या कडेला असलेल्या मोठ्या दगडावर जाऊन आदळली. दरम्यान चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस महामार्गा‌वरुन सेवा मार्गावर जाऊन पलटी झाली.रात्री १२ च्या सुमारास अपघात झाल्याने प्रवाशांत एकच गोंधळ उडाला. अपघाताची माहिती मिळताच शिरोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बस मधुन प्रवाशांना बाहेर काढले. जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सीपीआर मध्ये पाठविले आणि बस क्रेनच्या सहाय्याने सरळ केली. अपघाताची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकAccidentअपघात