शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

‘गोकुळा’तच श्रीकृष्ण राहू दे, अन्यथा महाभारत-: निवडीनंतर रंगली फटकेबाजी; पडद्यामागील घडामोडी उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 01:04 IST

तहहयात आपणच ‘गोकुळ’चे अध्यक्ष राहावे, असे काहींना वाटते; पण दुसऱ्यालाही अपेक्षा असतात, हा प्रक्रियेचा भाग आहे. इच्छुक अनेकजण होते; पण नेत्यांना रवींद्र आपटेच लायक

ठळक मुद्दे विश्वास पाटील यांचा सूचक इशारा

कोल्हापूर : तहहयात आपणच ‘गोकुळ’चे अध्यक्ष राहावे, असे काहींना वाटते; पण दुसऱ्यालाही अपेक्षा असतात, हा प्रक्रियेचा भाग आहे. इच्छुक अनेकजण होते; पण नेत्यांना रवींद्र आपटेच लायक वाटले म्हणून त्यांची निवड केल्याचा टोला अरुण डोंगळे यांनी हाणला. मध्यंतरी झालेला गोंधळ विसरून संघाच्या हितासाठी काम केले पाहिजे, श्रीकृष्ण ‘गोकुळ’ मध्ये आहे आणि महाभारतातही. त्याला कोठे ठेवायचे ठरवा, अन्यथा संघात महाभारत होईल, असा सूचक इशारा मावळते अध्यक्ष विश्र्वास पाटील यांनी दिला व मनातील खदखद व्यक्त केली.‘गोकुळ’ अध्यक्षपदी रवींद्र आपटे यांच्या निवडीनंतर अभिनंदनपर भाषणात संचालकांनी चौफेर फटकेबाजी करत पडद्यामागील घडामोडी उघड केल्या.

अध्यक्ष निवडीदरम्यान झालेल्या घडामोडीत एकमेकांवर शिंतोडे उडविण्याचे प्रकार झाले, आता ते थांबवून संघाच्या हितासाठी एकत्र येऊ या, असे पी. डी. धुंदरे यांनी सांगत विषयाला तोंड फोडले. धैर्यशील देसाई म्हणाले, राजकारणात शर्यत अटळ असते, प्रत्येकाला अध्यक्ष होण्याची इच्छा असते, म्हणजे आमच्यात मतभेद आहेत, असे नाही. आबाजी, बदल हा लोकशाही प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगत डोंगळे म्हणाले, ‘तहहयात आपणच अध्यक्ष राहावे, असे काहींना वाटते, ते चुकीचे आहे.

विश्वास पाटील म्हणाले, कॅशलेस सक्ती आणि पावडर अनुदानाबाबत भाजपचे बाबा देसाई, अनिल यादव काहीच करत नाहीत. रणजित पाटील हेही भाजपमध्ये असले, तरी ते थोडे आत-बाहेर असल्याने यादवसाहेब तुम्हीच थोडी ताकद लावा. यावर श्रीकृष्ण कोण? अशी विचारणा डोंगळे यांनी केली, त्यावर अरुणराव, आपणाला सगळं माहीत असल्याचा पलटवार पाटील यांनी केला. आपटे म्हणाले, विश्वास पाटील यांच्या कामाबद्दल आपण नेत्यांकडे तक्रार केली नाही, दुसºयाला संधी द्या एवढीच आपण विनंती केली; पण यामुळे एरव्ही सतत फोन करणाºया पाटील यांनी महिन्याभरात फोन केला नाही.पेपरमध्ये नाव आले की क्लेम लागतोपेपरमध्ये नाव आले की आपला क्लेम राहतो, हे खरे आहे. दीपक पाटील यांनी याबाबत मला विचारल्याचे सांगत आपटे म्हणाले, माझी तब्बेत ठणठणीत आहे, रोज १०० किलोमीटर प्रवास करतो, संपर्कामुळेच तालुक्यातील ६५ टक्के संस्था आपल्यासोबत आहेत.अध्यक्षपद मिळत असेल तर...सभागृहात येताच इच्छुक कोठे आहेत, किमान सूचक, अनुमोदक तरी व्हा, अशी कोपरखळी विश्वास पाटील यांनी मारल्याचे डोंगळे यांनी सांगितले. तोच धागा पकडत आबाजी सूचक, अनुमोदक कशाला, अध्यक्षपद मिळत असेल तर सोडावे का..? असा टोला डोंगळेंनी हाणला.आपटेंचा पायगुण : विश्वास पाटील अध्यक्ष झाले आणि तीन वर्षे दूध पावडरचे दर पडून तोटा झाला. आपटे झाल्यानंतर लगेच पावडरचे दर प्रतिकिलो १९५ रुपयांपर्यंत गेले, आता संघाला फायदा होईल, हा आपटेंचा पायगुण असल्याचा चिमटा अरुण नरके यांनी काढला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul Milkगोकुळ