शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

'दिगंबरा दिगंबरा' च्या अखंड गजरात नृसिंहवाडी दुमदुमली, दत्त जयंतीदिनी लाखो भाविकांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 2:00 PM

सोहळ्यास भाविकांनी केली होती मोठी गर्दी

नृसिंहवाडी : 'दिगंबरा दिगंबरा' च्या अखंड भजनात व श्री गुरुदेव दत्तच्या गजरात नृसिंहवाडीतील कृष्णा-पंचगंगा संगमतीर्थावर भक्तीमय वातावरणात काल, बुधवारी सायंकाळी पाच वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.दत्त जयंतीनिमित्त दत्त मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम झाले. मंदिरात पहाटे साडेतीन वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा, सकाळी सात ते बारा यावेळेत अनेक भक्तांनी ‘श्री ना’ पंचामृत अभिषेक पूजा केली.दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या चरणकमलावर महापूजा झाली. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला.

दुपारी तीन वाजता येथील ब्रम्हवृंदा मार्फत पवमान पंचसुक्त पठन झाले. साडेचार वाजता श्रींची उत्सवमूर्ती श्री नारायणस्वामी महाराज यांचे मंदिरातून वाजत गाजत मुख्यमंदिरात आणण्यात आली. ह.भ.प रोहित दांडेकर यांच्या कीर्तनानंतर ठीक पाच वाजता धार्मिक वातावरणात लाखो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक वातारणात मोठ्या उत्साहात विधिवत श्री दत्तजन्मकाळ सोहळा संपन्न झाला. जन्मकाळ सोहळ्यासाठी चांदीचा पाळणा विविध रंगाच्या फुलांनी आकर्षक सजविला होता. भाविकांनी सजविलेल्या पाळण्यावर अबिर, गुलाल व फुलांची मुक्तहस्ताने उधळण केली. जन्मकाळानंतर येथील दत्त मंदिरात पारंपारिक पाळणागीते व आरती व प्रार्थना करण्यात आली. रात्री दहा नंतर मंदिरात धूप, दीप,आरती व पालखी सोहळा पार पडला. गुरुदत्त शुगरचे माधवराव घाडगे यांनी यांनी श्री दत्त देव संस्थानला महाप्रसादासाठी दोन लाखाची देणगी दिली.जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्रसह गुजराथ, कर्नाटक, गोवा आदी अनेक राज्यातून लाखो भाविक आले होते. दत्त देव संस्थानचे विश्वस्त, ग्रामपंचायत चे सदस्य, शासकीय अधिकारी, जीवनमुक्ती संघटना कोल्हापूर, एस के पाटील व दत्त महाविद्यालय कुरुंदवाड व श्री दत्त विद्या मंदिर हायस्कूल चे विधार्थी स्वयंसेवकांनी तसेच दत्त देव संस्थान व ग्रामपंचायत चे कर्मचारी व स्वयंसेवकांनी अधिक परिश्रम घेऊन यात्रेचे नेटके नियोजन केले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDatta Mandirदत्त मंदिर