कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात हायपो क्लोराईडची फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:23 IST2021-04-18T04:23:50+5:302021-04-18T04:23:50+5:30

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील भाजी मंडई, ...

Spray of hypo chloride in the city against the backdrop of the corona | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात हायपो क्लोराईडची फवारणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात हायपो क्लोराईडची फवारणी

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील भाजी मंडई, मुख्य चौक, वर्दळीच्या ठिकाणी सोडियम हायपो क्लोराईडची फवारणी करण्यात आली.

भाजी मंडईसह विविध गल्ली, वर्दळीच्या ठिकाणी चार ट्रॅक्टरद्वारे ही औषध फवारणी करण्यात आली. यात पोवार गल्ली, सनगर गल्ली, रेडेकर गल्ली, कसबेकर गल्ली, सीबीएस स्टँड, रेल्वे स्टेशन परिसर, कपिलतीर्थ मार्केट,पाडळकर मार्केट, शाहूनगर परिसर, शाहूपुरी, कसबा बावडा भाजी मार्केट, भगवा चौक, एसएससी बोर्ड परिसर, सिद्धार्थनगर, वडर गल्ली, कदमवाडी, कापसे मळा, रॉयल अपार्टमेंट, सुनील अपार्टमेंट, ज्योतिर्लिंग अपार्टमेंट, रामानंदनगर, पवार कॉलनी, विश्वजित कॉलनी, आदी ठिकाणांचा समावेश होता.

फोटो : १७०४२०२१-कोल-केएमसी

आेळी : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने शनिवारी शहरातील मुख्य चौक, मंडई, वर्दळीच्या ठिकाणी हायपो क्लोराईडची फवारणी करण्यात आली.

Web Title: Spray of hypo chloride in the city against the backdrop of the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.