शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

ऑन द स्पॉट : ‘वळिवडे’चा स्वबळावर उभारणीचा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 12:24 IST

पंचगंगा नदीकाठाशेजारील आणि गांधीनगरसारख्या पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या बाजारपेठेलगत असणाऱ्या ‘वळिवडे’ या गावालाही पुराचा मोठा फटका बसला. प्रामुख्याने ऊस शेती आणि धनधान्यांनी भरलेली घरे बघता-बघता पाण्यात गेली.

ठळक मुद्देऑन द स्पॉट : ‘वळिवडे’चा स्वबळावर उभारणीचा नाराशासकीय मदत हवेतच; लोकसहभागातून आपत्तीवर मात

सचिन भोसले

कोल्हापूर : पंचगंगा नदीकाठाशेजारील आणि गांधीनगरसारख्या पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या बाजारपेठेलगत असणाऱ्या ‘वळिवडे’ या गावालाही पुराचा मोठा फटका बसला. प्रामुख्याने ऊस शेती आणि धनधान्यांनी भरलेली घरे बघता-बघता पाण्यात गेली.

ज्यांच्या घरांत पाणी शिरले त्यांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये त्या भयंकर पुराच्या आठ दिवसांत जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. पूर ओसरल्यानंतर गावात परतलेल्या गावकऱ्यांनी डोळ्यांतील आसवांना थांबविले. त्यानुसार लोकप्रतिनिधींच्या व लोकसहभागातून ग्रामस्थांनी पुन्हा गेल्या चार दिवसांत गावगाडा पुन्हा सुरळीत आणला.करवीर तालुक्यातील १३ हजार लोकसंख्या असलेल्या या गावाची ओळख पश्चिम महाराष्ट्रातील व्यापारी पेठ असलेल्या गांधीनगरलगतचे गाव म्हणून सर्वत्र आहे. गावच्या एका बाजूने पंचगंगा नदी वाहते. १९८९ व २००५ नंतरच्या पुरानंतर या गावात पूर काही अनुभवण्यास आला नाही. मात्र, त्यानंतर या गावात महापूर काय असतो, याची अनुभूती पुन्हा गावकऱ्यांना आली. ग्रामपंचायतीसह बहुतांश गावांत १० ते १२ फूट पाणी भरले होते.

वेगाने वाढणाऱ्या पाण्यामुळे १५०० कुटुंबांना फटका बसला. त्यातील निम्म्याहून अधिक गावकऱ्यांना संजय चव्हाण यांच्या पूर्ण अपार्टमेंटमध्ये, तर काहीजणांना जवळील शाळांचा आधार घ्यावा लागला. याशिवाय काही नागरिकांची सिंधी समाजाने निरंकारी मंडळ, प्रेम प्रकाश मंदिर, आदी ठिकाणी राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली होती. पुरामुळे कुमार विद्यामंदिर व कन्या विद्यामंदिर या शाळाही पाण्यात राहिल्या.

एवढे सगळे होऊनदेखील गावकऱ्यांनी काही हार मानली नाही. आहे त्या परिस्थितीत गावकऱ्यांनी प्रथम ज्येष्ठ नागरिक, जनावरे बाहेर काढली. पूर ओसरल्यानंतर घरात परतण्याआधीच ग्रामस्थांनी एकत्रितपणे गावची संपूर्ण स्वच्छता करून घेतली. औषध फवारणी करून स्थलांतरित झालेल्या काही लोकांना पुन्हा आपल्या घरात सोडले.ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल पंढरे यांच्यासह त्यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील तरुण मंडळाचे कार्यकर्ते रात्रीचा दिवस करून स्वच्छतेच्या कामात सहभागी झाले आहेत. गावकऱ्यांच्या एकीमुळे केवळ पंचनामा करताना पूररेषा म्हणून केलेल्या खुणेवरूनच इतके गाव पाण्यात गेले होते, याची माहिती होते. इतकी स्वच्छता गावकऱ्यांनी स्वबळाचा नारा देत केली आहे. आजही या गावात राज्यभरातील स्वयंसेवी संस्था येऊन स्वच्छता करीत आहेत.भिजलेले धान्य, घरातील खाट, भांडी, साहित्य स्वच्छ करण्याचे काम अजूनही सुरूच आहे. विशेष म्हणजे अद्यापही या गावात सरकारी मदतीचे पाच हजार पोहोचलेलेच नाहीत. आरोग्य तपासणी व औषध उपचारांची सोय सरकारी व खासगी संस्थांमार्फत सुरू आहे. नुकसानीचे पंचनामे करून मदतीसाठी प्रस्ताव देण्याची लगबग गावचावडी येथे सुरू आहे.वळिवडेच्या कुमार विद्यामंदिर व कन्या विद्यामंदिरामध्ये पाणी शिरल्याने शालेय साहित्यासह विविध वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शालेय पोषण आहारासाठी आणलेली धान्याची पोतीही यात भिजून गेली.अंदाज चुकलायापूर्वी आलेल्या पुरात केवळ दोन ते चार फुटांपर्यंत पाणी आले होते. यावेळी मात्र, दहा ते अकरा फूट पाणी गेल्याने अनेक ज्येष्ठांचा अंदाज चुकला. परिणामी उंचावर असलेले साहित्य, धान्य भिजून गेले. यात तांदूळ, गहू, मका, आदींचा प्रामुख्याने समावेश आहे.काही प्रमाणात दिलासागावातील १७०० रेशनकार्डधारकांसाठी प्रत्येकी दहा किलो गहू, तांदूळ आले आहे. त्यांचे वाटप सुरू आहे. गावच्या तलाठ्यांसह इतर चार गावचे तलाठी, ग्रामपंचायत सदस्य, तरुण मंडळाचे कार्यकर्ते पंचनामा करण्यात मदत करीत आहेत.

पिके कुजलीपंचगंगा नदीकाठावरील या गावात ५७१ हेक्टर जमीन शेतीखाली आहे. मुख्य पीक ऊसच आहे. शेतीबरोबर पशुपालन हा व्यवसाय आहे. दूध व गांधीनगरच्या व्यापार पेठेमुळे या गावाला काही प्रमाणात सुबत्ता आली आहे. गावातील बहुतांश युवक शेतीबरोबर गांधीनगर येथील दुकानांमध्ये कामगार म्हणून कार्यरत आहेत.

गावची लोकसंख्या १३००० इतकी आहे; तर जनावरे ६००हून अधिक आहेत. ५७१ पैकी ४०० हून हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने उसासह सोयाबीन कुजले आहे. त्यामुळे यंदा आर्थिक फटका मोठा बसणार हे गृहीत धरून येथील अनेक कुटुंबे कामाला लागली आहेत.

गावातील १५० वर्षांपूर्वीच्या राम मंदिरातही प्रथमच पाणी भरले होते. शेजारीच राहणाऱ्या पिंटू गुरव, बबन गुरव, बापूसो गुरव यांचे तर संपूर्ण घर अतिवृष्टीत पडले आहे. त्यामुळे पुन्हा उभारणी करण्यासाठी या गुरव कुटुंबातील सर्वच उरलेसुरले साहित्य बाहेर काढण्यात दिवसभर मग्न झाल्याचे दृष्टीस पडले.वळिवडे

  • लोकसंख्या - १३०००
  • बाधित कुटुंब संख्या - १५००
  • बाधित लोकसंख्या- सुमारे ९५००
  • पूर्णपणे पडलेली घरे - ७०
  • अंशत: पडझड - ६०
  • मृत जनावरे - १० (चार शेळ्या, सहा गाई-म्हशी)
  • अंदाजित नुकसान - सुमारे २५ कोटी

 

केवळ पूररेषेच्या खुणाच प्रत्येक घराच्या भिंतीवर दिसतात. लोकसहभाग व लोकप्रतिनिधींच्या मदतीमुळे गाव पुन्हा उभारले आहे; तर सरकारी सानुग्रह अनुदान अद्यापही आलेले नाही.- अनिल पंढरे,सरपंच, वळिवडेगावातील पूरग्रस्तांना उभारी देण्यासाठी शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी. ती देताना थेट बँकेत जमा करावी.- उमेश शिंगे, ग्रामस्थ, वळिवडे,

 

अनेकजण मंदिराच्या आश्रयालावळिवडे गावातील दिगंबर जैन मंदिरात अद्यापही चार कुटुंबातील अनेकजण आश्रयाला आहेत. त्यांना आमदार अमल महाडिक, ग्रामपंचायतीतर्फे जेवणाची व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय अनेकजण शहरातील पाहुण्यांकडे राहण्यास गेले आहेत.ग्रामस्थांकडून ही मागणी

  1. पूरग्रस्तांचे महिन्याभरातील वीज बिल माफ करा
  2.  यंदाचा शेतसारा माफ करा
  3. पशुखाद्य, ओला चारा द्यावा
  4. नदीकाठच्या शेतातील मोटरी वाहून गेल्या आहेत, त्यांची नुकसान भरपाई द्या.
  5. गॅस सिलिंडरची मोठ्या प्रमाणात आवश्यकता
  6. अनुदानावर सोलर प्रकल्प घरटी द्या

गांधीनगरचा काही भाग बाधितगांधीनगर सिंधी सेंट्रल पंचायतीमधील कोयना कॉलनी, माळवाडी परिसरातील काही घरे पूरबाधित झाली होती. यात ६० हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. किमान १२५ कुटुंबे बाधित , तर ६०० लोकांना स्थलांतरित म्हणून हेमू कलाणी प्रायमरी स्कूल, निरंकारी मंडळ, प्रेम प्रकाश मंदिर, साईबाबा मंदीर, सिंधी बांधवांच्या मदतीने आसरा घ्यावा लागला. यात कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर