धामणी खोऱ्यात जोरदार वाऱ्यासह तुरळक पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:22 IST2021-05-17T04:22:26+5:302021-05-17T04:22:26+5:30
सध्या धामणी नदीचे पात्र कोरडे पडले असून शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे परिसरातील बळीराजा जोरदार ...

धामणी खोऱ्यात जोरदार वाऱ्यासह तुरळक पाऊस
सध्या धामणी नदीचे पात्र कोरडे पडले असून शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे परिसरातील बळीराजा जोरदार वळिवाच्या प्रतीक्षेत होता. मात्र अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेले दोन दिवस धामणी खोऱ्यात जोरदार वारे वाहत आहे. त्याच बरोबर तुरळक पावसाच्या सरीही पडत असून वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाला आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली असून घरांचे पत्रेही उडाले आहेत. हा पाऊस ऊस पिकास फायदेशीर असला तरी जोरदार वाऱ्यामुळे रायवळ आंबे फळांचा झाडाखाली अक्षरश: सडा पडला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अजूनही उन्हाळी भात, भुईमूग, मका आदी पिके शेतातच असून त्यांच्या काढणीबरोबरच अन्य शेती मशागतीची कामे खोळंबली आहेत.