‘लोकमत’ सखींचा ‘दे धम्माल’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

By Admin | Updated: July 29, 2014 23:07 IST2014-07-29T19:56:12+5:302014-07-29T23:07:11+5:30

२०१४ चा लकी ड्रॉ जाहीर : आहाराविषयी रमेश कारंडे यांचे मार्गदर्शन

Spontaneous response to 'Lokmat' Sakhi's 'De Dhambal' | ‘लोकमत’ सखींचा ‘दे धम्माल’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘लोकमत’ सखींचा ‘दे धम्माल’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजी : ‘लोकमत’ सखी मंच आयोजित ‘दे धम्माल’ या कार्यक्रमाला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये आयोजित स्पॉट गेम, फनी गेम याचा सखींनी आनंद लुटला. दरम्यान, सन २०१४ चा लकी ड्रॉ काढण्यात आला. तसेच डॉ. रमेश कारंडे यांनी सकस संतुलित पौष्टिक आहाराबाबत मार्गदर्शन केले.
येथील रोटरी क्लबच्या हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. रोटरी क्लब, अ‍ॅन्स क्लब आणि साई अमृत सकस संतुलित पौष्टिक शाकाहार केंद्र इचलकरंजी हे कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते. कार्यक्रम स्पॉट गेमने सुरू करण्यात आला. यावेळी सखींनी चढाओढीने सहभाग नोंदवत दहाजणींनी बक्षिसे मिळविली. यामध्ये छाया म्हेत्रे, साक्षी पाटील, शैला गायकवाड, रूपाली पाटील, सुप्रिया दुधाणे, मंगल लोया, स्नेहल बुर्जी, शुभांगी गुगळे, धनश्री कुलकर्णी, वर्षा कवठेकर यांचा समावेश आहे.दरम्यान, डॉ. रमेश कारंडे यांनी योग्य आहार घ्या व जीवन निरोगी बनवा, असा सल्ला देत आहाराविषयीचे मार्गदर्शन केले. लठ्ठपणामुळे ३५० पेक्षा जास्त आजार होतात.
तणावमुक्त राहणे, सकस आहार, योग्य व्यायाम यामुळे अनेक आजार कशाप्रकारे टाळता येतात, याबाबत स्लाईड शो द्वारे सखींना मार्गदर्शन केले. दरम्यान, ‘लोकमत’ २०१४ च्या सखी सदस्यांसाठीचा लकी ड्रॉ यावेळी उपस्थित सखींची लहान मुले व उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते काढण्यात आला. सर्व विजेत्या सखींचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी जुलै महिन्यातील सखींचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक भारती सुरपुरीया यांनी केले. सूत्रसंचालन स्मिता मुथा यांनी केले. यावेळी ‘साई अमृत’च्या संचालिका संध्या रुग्गे, रोटरी क्लब आॅफ इचलकरंजी अ‍ॅन्स क्लबच्या अध्यक्षा उमा दाते, सचिव मेघा यळरुटे, द्वारकाधीश फोटो स्डुडिओच्या संचालिका मनिषा करांडे, शुभम आर्ट गॅलरीच्या संचालिका ज्ञानदा जोशी, नॅशनल फिटनेसच्या प्राजक्ता चौगुले, आदी प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमासाठी बिना कारेकर, वैशाली डोंगरे, संगीता गजरे, डॉ. नीलम वाडकर, रागिनी यादव यांचे सहकार्य लाभले.
‘लोकमत’ सखी मंच २०१४ लकी ड्रॉ निकाल याप्रमाणे : डिझायनर साडीज्- वच्छला मनोहर कारके (ओळखपत्र क्रमांक ०५६०३५), मयुरी चकोते (०५६४०२), विश्वजिता रामचंद्र चव्हाण (०५५५५६), शैलजा शीतल पाटील (०५६३४८), वैशाली शशिकांत मोहिते (०५५७५१), सविता अविनाश खंजिरे (१५३६८२), सविता संतोष पाटील (०५५६४५). दि सोसायटी फर्निचर्स-धनंजय फर्निचर्स- यामध्ये चन्नमा अर्जुन गंथडे (०५५५९७७), सुवर्णा धन्यकुमार कल्याणी (०५६०४९). श्रद्धा आयुर्वेदिक रिसर्च अ‍ॅण्ड सेंटर-योगिता कुमार धोतरे (०५५५८६), सुनीता संपत शेलार (०५६२९६), वृषाली मोहन पोतदार (०५५९२०), सुवर्णा प्रकाश पाटील (०५५८२९), जलजा जयराज पाटील (०५५९२८), शोभा सदाशिव व्हनुंगरे (०५५९८४), ज्योती सुनील नलवडे (०५६३६८), रूपाली सुरेश मगदूम (०५५९८९), मीना ओमप्रकाश पुरोहित (०५६०९०), तन्वी मुंदडा, शोभा प्रकाश बाबर (०५५५५९), संगीता जयवंत सुतार (०५५८४८), विजया प्रकाश हळदेकर (०५५८५०), वर्षा आनंदराव पाटील (०५६४६९), विश्वजिता रामचंद्र चव्हाण (०५५५५६).
दीपाली आॅप्टीशियन - सारिका विजय भोसले (०५५८१३), नेहा नीरज बाहेती (१५३७७२), संगीता नितीन पाटील (५५०५५८३६), निर्मला विनायक चव्हाण (०५६०५१), रिजवाना फिरोजखान पाथरवट (०५५७९६). मानसी लेडीज कलेक्शन-प्रेमला सूर्यकांत पाटील (०५६२१९), निर्मला नारायण भंडारे (०५५८६४), सुषमा शशिकांत कानडे (०५५९९१), मीना ओमप्रकाश पुरोहित (०५६०९०), गीता महेश पाटील (१५३६६९), पद्मावती प्रकाश मिर्जी (१५३७०३). शुभम आर्ट गॅलरी-विजया संदीप सैसाले (०५५६५८), अनिता संजयकुमार चौगुले (०५६३५७), आशा भाऊसाहेब देसाई (०५६१८६), संगीता महेश परीट (०५६००१), फातिमा मेहबूब मोमीन (०५६१७४), उषा अनिल महाबळे (०५५७७२), पुष्पा सुभाष मलिकवाडे (०५६३१३), सुनीता झुंझुनवाला (०५६२३०), पद्मावती प्रकाश मिर्जी (१५३७०३), रेखा राहुल गोंदकर (१५३८३७). (प्रतिनिधी)

Web Title: Spontaneous response to 'Lokmat' Sakhi's 'De Dhambal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.