मिणचे खुर्द येथे कोरोना लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:23 IST2021-03-26T04:23:18+5:302021-03-26T04:23:18+5:30
गारगोटी : मिणचे खुर्द (ता. भुदरगड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणास ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. ही ...

मिणचे खुर्द येथे कोरोना लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद
गारगोटी : मिणचे खुर्द (ता. भुदरगड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणास ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. ही लस दोन टप्प्यात दिली जाणार आहे. जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांचे हस्ते कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
सर्व नागरिकांना ही कोविड लस टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच ही लस सर्व प्रकारे सुरक्षित आहे. तरी नागरिकांनी नोंदणी करून लसीकरण करून घ्यावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. पी. रिंढे यांनी केले आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्या आक्काताई नलवडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. पी. रिंढे, रवी देसाई, डॉ. कोजागिरी देसाई, आर. व्ही. देसाई, सरपंच जयश्री खेगडे, उपसरपंच रामचंद्र देसाई, प्रवीण नलवडे, दामाजी पाटील, अजित कांबळे आदींसह ग्रामस्थ तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राकडील समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक,सेविका यांसह इतर कर्मचारी वर्ग व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
---
फोटो :
मिणचे खुर्द : येथे कोरोना लसीकरणास उपस्थित ज्येष्ठ नागरिक.