कळेत रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:18 IST2021-07-11T04:18:36+5:302021-07-11T04:18:36+5:30
कळे : लोकमतचे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी स्व.जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त 'लोकमत नातं रक्ताचं' व कोल्हापूर पोलीस दलाच्या 'मिशन संवेदना’या ...

कळेत रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
कळे :
लोकमतचे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी स्व.जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त 'लोकमत नातं रक्ताचं' व कोल्हापूर पोलीस दलाच्या 'मिशन संवेदना’या उपक्रमांतर्गत कळे (ता. पन्हाळा) येथे रक्तदान शिबिर झाले. या शिबिरात ५४ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघ, पोलीस पाटील संघटना व कळे परिसरातील तरुण मंडळे यांचे सहकार्य लाभले.
शिबीराचे उद्घाटन कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे संचालक आबा रामा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी जि.प. माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील , कळेचे सरपंच सुभाष सर्जेराव पाटील, माजी उपसरपंच बाजीराव पाटील, पन्हाळा पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी आनंदराव आकुर्डेकर , कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे माजी विभागीय सचिव टी.एल.मोळे, लालबावटा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव घोरपडे , गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहा.पो. नि. रणजित पाटील, पो. निरीक्षक प्रवीण शिंदे, पोलीस हवालदार अशोक निकम, पो. कॉन्स्टेबल सागर पाटील , संजय पाटील, डॉ.अजित पाटील, वाघुर्डेचे माजी सरपंच विलास दगडू कांबळे, भाजप युवा आघाडीचे अध्यक्ष प्रताप काळे, युवक कॉंग्रेसचे राकेश काळे, समर्थ बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक सचिव संभाजी दांगट, धर्मराज हॉलिबॉल क्लबचे संस्थापक अध्यक्ष जयसिंग प्रभावळे , स्पार्क हॉलिबॉल क्लबचे सतीश जाधव, आसिफ जमादार, आबा कालेकर, व्यापारी संघटनेचे सुनील डबिरे, रामचंद्र झुरे सुरेश नाईक ( वाघुर्डे ) उपस्थित होते. भार्गव भाळवणे , पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष पी.व्ही.पाटील , विद्यमान अध्यक्ष शब्बिर मुल्ला , धनाजी गुरव , अरुण तळेकर, युवराज बोरगे, धनाजी पाटील , संग्राम पाटील, सुरेश वडर, तानाजी पाटील, सचिन सुतार, रघुनाथ मोरे , कृणकांत कांबळे, जालंदर कांबळे , नामदेव भोसले , राजू महाजन , दिलीप पाटील यांनी परिश्रम घेतले.
चौकट -
दिव्यांग आरोग्य सेविकेसह दोन महिलांनी केले रक्तदान
कळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील दिव्यांग आरोग्य सेविका मनीषा कांबळे यांनी तसेच कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा गट प्रवर्तक स्मिता कुलकर्णी यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. तर प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी येथे कार्यरत असणारे व
शिवगर्जना फाउंडेशन सातार्डे (ता पन्हाळा ) संस्थापक अध्यक्ष दिगंबर चव्हाण यांनी रत्नागिरी जिल्ह्यातून येऊन रक्तदान केले.
१० कळे रक्तदान शिबिर
फोटो ओळ -
कळेतील रक्तदान शिबिर उदघाटनप्रसंगी जि.प.माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, कुंभी कासारी कारखान्याचे संचालक आबा रामा पाटील, कळेचे सरपंच सुभाष सर्जेराव पाटील, गट शिक्षणाधिकारी आनंदराव आकुर्डेकर, टी.एल. मोळे , भगवानराव घोरपडे, सहा.पो. नि. रणजित पाटील , पो.निरीक्षक प्रवीण शिंदे , पोलीस हवालदार अशोक निकम , संजय पाटील, पी.व्ही.पाटील, शब्बिर मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.
छाया - लाजरी फोटो. काटेभोगाव