शहर राष्ट्रवादीच्यावतीने रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:23 IST2021-04-25T04:23:22+5:302021-04-25T04:23:22+5:30
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनानुसार व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त शहर ...

शहर राष्ट्रवादीच्यावतीने रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनानुसार व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त शहर राष्ट्रवादीच्यावतीने बुधवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये १७६ जणांनी रक्तदान केले.
आर. के. पोवार म्हणाले, ‘‘राज्यातील रक्त टंचाईच्या जाणिवेने आजारी असतानाही शरद पवार यांनी हॉस्पिटलमधून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना रक्तदानाचे आवाहन केले होते. त्यानुसार रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.’’ सुनील देसाई यांनी स्वागत केले. निरंजन कदम यांनी आभार मानले. राजेश लाटकर, सई खराडे, विनायक फाळके, अनिल कम, जहिदा मुजावर, रमेश पोवार, महेंद्र चव्हाण, प्रसाद उगवे, प्रकाश पाटील, सुनील पाटील, प्रकाश गवंडी, सुनीता राऊत, हेमंत कांदेकर, रियाज कागदी, शीतल कवडे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त शहर राष्ट्रवादीच्यावतीने शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी आर. के. पोवार, सई खराडे, राजेश लाटकर आदी उपस्थित होते. (फोटो-२४०४२०२१-कोल-एनसीपी)