शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला विसरून तरुणाईकडून रंगांची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 18:51 IST

Holi Kolhapur- कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना आणि निर्बंध अधिक कडक होताना त्याला विसरून कोल्हापुरातील तरुणाईने शुक्रवारी रंगांची उधळण केली. त्यातील अनेकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, आदी नियम धाब्यावर बसविले.

ठळक मुद्देकोरोनाला विसरून तरुणाईकडून रंगांची उधळणसोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसविले

कोल्हापूर : कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना आणि निर्बंध अधिक कडक होताना त्याला विसरून कोल्हापुरातील तरुणाईने शुक्रवारी रंगांची उधळण केली. त्यातील अनेकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, आदी नियम धाब्यावर बसविले.

शहरातील प्रमुख चौकाचौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त होता. त्यांच्या भीतीमुळे मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट होता. रंगपंचमीनिमित्त व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्याने महाद्वार रोड, गुजरी, शिवाजी रोड, बिंदू चौक परिसरात अघोषित बंदसारखी स्थिती दिसून आली; मात्र गल्ली, कॉलनी, अपार्टमेंटमध्ये युवक, युवती, लहान मुले, आदींनी पिवडीचा धुरळा उडवित रंगपंचमी साजरी केली. काही नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रंगोत्सव करणे टाळले.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने रंगपंचमी साजरी करणे टाळा, असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत काही नागरिकांनी रंगपंचमी साजरी करणे टाळले; मात्र काहींनी कोरोनाची दुसरी लाट असताना त्याकडे दुर्लक्ष करून रंगांची उधळण केली. त्यामध्ये लहान मुले, तरुणाईचे प्रमाण अधिक होते. लहान मुलांनी सकाळी रंगपंचमी साजरी केली. दुपारी तरुणाई घरातून बाहेर पडली.

नागाळा पार्क, ताराबाई पार्क, स्टेशन रोड, शाहुपुरी, राजारामपुरी, बिंदू चौक, गंगावेश, शिवाजीपेठ, मंगळवारपेठ, बुधवारपेठ, रविवारपेठ, लक्ष्मीपुरी, आदी परिसरांसह उपनगरांमधील गल्ली, कॉलनी, सोसायटी, अपार्टमेंटमध्ये रंगोत्सव झाला. पिवडी, विविध रंगांनी रस्ते रंगले होते. काहींनी रस्त्यांमध्ये पाण्याचा शॉवर लावला होता. मोजक्या ठिकाणी ध्वनियंत्रणावरील गाणी वाजत होती.

काही युवक, युवती गटाने दुचाकीवरून फिरत रंगांची उधळण करत होते. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाई केली. उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर रंगपंचमी खेळणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले. शहरातील विविध रस्त्यांवरील वर्दळही कमी झाली. सायंकाळी पाचनंतर बाजारपेठांमधील दुकाने काही प्रमाणात सुरू झाल्याने पुन्हा थोडी वर्दळ वाढली. 

टॅग्स :Holiहोळीkolhapurकोल्हापूर