शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

वेगवान दुचाकीची कारला धडक, जखमी तरुणाचा अखेर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 13:03 IST

शिवाजी विद्यापीठ ते मिलिटरी कॅँटीन रस्त्यावर भरधाव मोटारसायकलची समोरच्या कारला धडक बसून गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या तरुणाचा शुक्रवारी पहाटे उपचार सुरु असताना दुर्दैवी मृत्यू झाला.

ठळक मुद्देवेगवान दुचाकीची कारला धडकशिवाजी पेठेतील जखमी तरुणाचा अखेर मृत्यू

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ ते मिलिटरी कॅँटीन रस्त्यावर भरधाव मोटारसायकलची समोरच्या कारला धडक बसून गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या तरुणाचा शुक्रवारी पहाटे उपचार सुरु असताना दुर्दैवी मृत्यू झाला.

संकेत बाजीराव पाटील (वय २०, रा. शिवाजी पेठ) असे त्याचे नाव आहे. त्याचा मित्र मंदार मधुसूदन पाटील (वय १९, रा. नागाळा पार्क कमानीजवळ ) याचाही अपघातामध्ये मृत्यू झाला. वेगाच्या नशेत दोघा महाविद्यालयीन तरुणांचा नाहक बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.मंदार पाटील व संकेत पाटील दोघेजण आर. के.नगर परिसरातील भारती विद्यापीठात दुसºया वर्षात शिकत होते. गुरुवारी (दि. ७) सायंकाळी चारच्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर दोघेजण दुचाकीवरून कोल्हापुरात येत असताना शिवाजी विद्यापीठ ते मिलिटरी कॅँटीन रस्त्यावर शासकीय तंत्रनिकेतनपासून पुढे येताच मोटारसायकलवरील ताबा सुटून समोरच्या कारला पाठीमागून जोराची धडक दिली.

त्यामध्ये दोघांच्याही डोक्याला गंभीर दूखापत झाली होती. उपचार सुरु असताना काही तासातच मंदारचा मृत्यू झाला. त्यानंतर शुक्रवारी पहाटे संकेतचा मृत्यू झाला. पाठोपाठ दोघांचाही मृत्यू झाल्याने नागाळा पार्क आणि शिवाजी पेठ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर