गतिमंद बालकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:18 IST2021-07-21T04:18:03+5:302021-07-21T04:18:03+5:30
गडहिंग्लज : हातपाय धुण्यासाठी शेततळ्याकडे गेलेल्या गतिमंद बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. वेदांत राजेश पवार (वय ९, मूळ ...

गतिमंद बालकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू
गडहिंग्लज : हातपाय धुण्यासाठी शेततळ्याकडे गेलेल्या गतिमंद बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. वेदांत राजेश पवार (वय ९, मूळ गाव निपाणी, जि. बेळगाव, सध्या रा. करंबळी, ता. गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी (२०) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, मंगळवार (२०) दुपारी साडेबाराच्या सुमारास वेदांत हा इंद्रायणी पाटील यांच्या शेततळ्याकडे गेला होता.
दरम्यान, हातपाय धुण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी शेततळ्याकडे तो गेला होता. त्यावेळी पाय घसरून तो शेततळ्यात पडला. गतिमंद असल्यामुळे त्याला हालचाल व आरडाओरड करता आली नाही. आजूबाजूलाही कुणी नसल्यामुळे त्याचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आजी, आजोबा, आई, वडील व बहीण असा परिवार आहे.
मारुती वांद्रे यांच्या वर्दीवरून घटनेची पोलिसात नोंद झाली आहे. हेडकॉन्स्टेबल विठ्ठल मुळीक अधिक तपास करीत आहेत.
चौकट :
कुटुंबीयांचा आक्रोश
वेदांत हा लहानपणापासूनच आजोळी करंबळीमध्ये राहत होता. त्यामुळे आजी-आजोबांचा त्याच्यावर खूप लळा होता. मात्र, एकुलत्या मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने आई-वडिलांसह आजी-आजोबांनी व बहीण वैष्णवीने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
वेदांत पवार : २००७२०२१-गड-१०